प्रयत्न करूनही वजन वाढत नाही? मग 'या' टीप्स वाचा अन् झटपट वाढवा वजन

morning tips for weight gain nagpur news
morning tips for weight gain nagpur news

नागपूर : वजन खूप कमी असणे ही देखील एक समस्या आहे. कारण जेव्हा आरोग्याच्या समस्या निर्माण होतात त्यावेळी त्यांचा सामना करणे कठीण होते. पोषक तत्वांची कमी, प्रजनन क्षमता नसणे, रोगप्रतिकार शक्ती चांगली नसणे असे एक ना अनेक समस्या उद्भवतात. वजन वाढविणे हे कठीण नाही. आपल्या दैनंदिन जीवनात काही बदल केल्यास आपले वजन नक्की वाढले. पण, त्यासाठी आपली रोगप्रतिकारशक्ती चांगली असणे गरजेचे आहे. अनेकजण वजन वाढविण्यासाठी काही सप्लीमेंट्स घेत असतात. मात्र, आपल्या जीवनशैलीत थोडा बदल केला तरी आपण आपले वजन सहज वाढवू शकतो. त्यासाठी आम्ही तुम्हाला काही मॉर्निंग हँबीट्सविषयी आज सांगणात आहोत.

प्रोटीन असलेल्या ब्रेकफास्टचे सेवन करा -
हेल्दी पद्धतीने वजन वाढविण्यासाठी तुम्हाला मांसपेशींवर लक्ष देणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्वाधिकी प्रोटीन असलेल्या पदार्थांचे सेवन करा. तसेच शारीरिक हालचाली देखील गरजेच्या आहेत. त्यासाठी सोयाबीन, मासे, अंडी, डेअरी पदार्थ आणि नट्स असलेल्या खाद्यपदार्थांचे जास्ती जास्त सेवन करा.

नाश्त्यासोबत फुल फॅट मिल्क घ्या -
एका दिवसात एक ग्लास दूध प्यायल्यास ते आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. त्यामुळे तुमचे हाडे मजबूत होण्यास मदत होते. टोंड या दूधापेक्षा फॅट वाल्या दूधाचे सेवन करावे. त्यामुळे तुमच्या मासपेशी मजबूत होण्यासोबत तुमचे जवन वाढायला मदत देखील होईल. तसेच तुम्ही नेहमी ताजेतवाने राहाल.

वेट लिफ्टींग एक्सरसाइज -
फक्त पोषक तत्व असलेले खाद्यपदार्थ खाल्ल्यानेच वजन वाढेल असे नाही. त्यासाठी नियमित व्यायाम करणेदेखील गरजेचे आहे. त्यामुळे मांसपेशी तयार होतील. दररोज सकाळी उठल्यानंतर व्यायाम करणे गरजेचे आहे. 

जेवणानंतर पाणी प्या -
योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने आरोग्य चांगले राहते. तसेच पाण्यामुळे फक्त शरीरातील घाणच बाहेर पडत नाही, तर तुमची त्वचा चमकण्यास मदत देखील होते. तुम्हाला वजन वाढवायचे असेल तर जेवण करताना अधिक पाणी पिऊ नका. असे केल्यास लवकर पोट भरल्यासारखए वाटेल. त्यामुळे पूर्ण जेव झाल्यानंतरच पाणी प्या.

कार्ब्स आणि उच्च फॅट असेलेल पदार्थ खा -
तुम्ही वजन वाढविण्याचा प्रयत्न करत असाल तर कार्बोहायड्रेट अंत्यत गरजेचे आहे. त्यासाठी जंक फूड खाणे योग्य नाही. कार्बोहायड्रेट्स असणारे तांदूळ, क्विनोआ, ब्लूबेरी, गोड बटाटे, पनीर आदी पदार्थ आहे. त्यामुळे या पदार्थांचे सेवन केल्यास नक्कीच वजन वाढल्याशिवाय राहणार नाही.

(डिसक्लेमर : वरील लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीच्या आधारावर आहे. याबाबत अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com