Dental Laser
Dental Laseresakal

Dental Laser : दातांत ना वेदना ना रक्तस्राव 'असे' आहे लेझर उपचार

आज वैद्यकीय शास्त्रात फार प्रगती झालेली आपण पाहत आहोत, याला दंतशास्त्रही अपवाद नाही.
Summary

बऱ्याच रुग्णांना तोंड उघडताना जबड्याच्या स्नायूंमध्ये, हाडांमध्ये वेदना होतात अशा वेदनांसाठीसुद्धा लेझर उपयुक्त आहे.

-डॉ. नेहा अभिजित पाटील, nehathakurrr@gmail.com

डेंटिस्टकडे (Dentist) जायचे म्हटले की, सगळ्यांनाच खूप भीती वाटते आणि ती भीती असते दुखण्याची. त्यामुळे बऱ्याच वेळेला योग्य वेळेत उपचार घेतले जात नाहीत; पण हीच उपचारपद्धती वेदनाविरहित, रक्तस्राव न होता कमी प्रमाणात इंजेक्शनद्वारे (Injection) भूल देऊन किंवा भूल न देता करता आल्या तर कोणाला नाही आवडणार? हे डेंटल लेझरद्वारे शक्य झाले आहे.

आज वैद्यकीय शास्त्रात फार प्रगती झालेली आपण पाहत आहोत, याला दंतशास्त्रही अपवाद नाही. अशीच एक अत्याधुनिक प्रगती म्हणजे डेंटल लेझर. (Dental Laser) डेंटल लेझरद्वारे दातांच्या, हिरडीचा व तोंडातील इतर भागात बऱ्‍याच उपचारपद्धती वापरता येतात. सुरुवातीला लेझरद्वारे कोणत्या दंतक्रिया करता येतात हे पाहूया. हिरड्यांचे आजार बरे करण्यात लेझरचा खूप महत्त्वाचा वाटा आहे. एखाद्या दंतरुग्णास हिरड्यांचा आजार झाल्यास त्या रुग्णाच्या हिरड्यांची शस्त्रक्रिया करून त्या बळकट केल्या जातात व दातांचे आयुष्य वाढवले जाते; परंतु ही उपचारपद्धती जर लेझरने झाली तर त्याचा नक्की काय फायदा होतो?

Dental Laser
Oral Cancer Symptoms : कॅन्सर होऊ नये यासाठी काय करावे? Cancer नक्की कशामुळं होतो? जाणून घ्या..

लेझरमुळे हिरडीच्या कानाकोपऱ्‍यात असलेल्या जंतूचे निर्जंतुकीकरण (Disinfection) अगदी सहज करता येते तसेच दाताभोवती नवीन हिरडी हाड तयार होण्याची प्रक्रिया (Biostimulation) अधिक चांगल्याप्रकारे साधता येते. हिरडीवर असलेली गाठ काढणे (Granuloma), ओठावर असणारी लाळग्रंथीची गाठ काढणे (Mucocele), ओठांच्या आत असलेला जास्तीचा फोल्ड कमी करणे (Frenectomy), दात बसवण्यासाठी हिरडीचा आकार वाढवणे (Crown Lengthening), वेड्यावाकड्या हिरड्यांना आकार देणे (Gingivoplasty), अक्कलदाढेवरची हिरडी बाजूला करणे(Operculectomy) अशा विविध प्रोसिजर लेझरद्वारे करता येतात.

Dental Laser
Health News : मुलांमधील स्थूलतेचा वाढता प्रकोप; कोणती आहेत कारणे, कशी घ्याल काळजी?

याचा महत्त्वाचा भाग म्हणजे लेझरद्वारे या उपचारपद्धती करताना इंजेक्शनद्वारे भूल द्यावी लागत नाही किंवा अगदी कमी प्रमाणात द्यावी लागते. लेझरद्वारे प्रक्रिया झाल्यास जखम लगेचच भरते. त्यामुळे प्रोसिजरनंतर होणारा त्रास फार कमी होतो व त्यामुळे वेदना कमी करण्याची औषधे जास्त प्रमाणात घ्यावी लागत नाहीत किंवा काही वेळेस औषधांची गरज अजिबात भासत नाही. वरील कोणतीही तोंडातील शस्त्रक्रिया करताना रक्तस्राव अजिबात होत नाही, हे याचे खास वैशिष्ट्य आहे.

लेझरद्वारे दातांचे व हिरड्यांचे सौंदर्य वाढवण्याच्या प्रक्रियासुद्धा अगदी सहज करता येतात. लेझरद्वारे दातांचे ब्लिचिंग करता येते. हिरड्यांवर असलेले काळे डाग काढून हिरड्या गुलाबी रंगाच्या करता येतात. वरील ट्रिटमेंटचे रिझल्ट हे कायमस्वरूपी नसले तरी लेझरने केल्यास त्याचे परिणाम अधिक काळ टिकतात व आधी सांगितल्याप्रमाणे ही प्रक्रिया वेदनाविरहित करता येतात. थंड, गरम खाल्ले की, दातांना संवेदना होणे (sensitivity) ही तर अगदी सर्वांनाच होणारी समस्या आहे.

Dental Laser
खाडीत लालभडक उगवता सूर्य, मगरीने भरलेले जगबुडीचे खोरे अन् बरंच काही; मालदोलीत असं नेमकं आहे तरी काय?

यासाठी लेझर उपचारपद्धती केल्यास अगदी काही सेकंदांमध्ये /मिनिटामध्येच संवेदना नाहीशी होऊन फरक जाणवतो. तोंडामध्ये वारंवार येणारे अल्सर (Ulcer) कवळी लागून झालेली जखम हे अगदी २४ ते ४८ तासात लेझरने बरे होतात. तंबाखू, गुटखा खाऊन तोंडात तयार झालेल्या सफेद रंगाच्या जागा (Pre cancerous white lesions) यांचे भविष्यात कॅन्सरमध्ये रूपांतर होण्याची शक्यता असते, अशा खुणा/जागा लेझरद्वारे बऱ्‍या करता येतात.

बऱ्याच रुग्णांना तोंड उघडताना जबड्याच्या स्नायूंमध्ये, हाडांमध्ये वेदना होतात अशा वेदनांसाठीसुद्धा लेझर उपयुक्त आहे. तोंडाजवळ असणाऱ्‍या मज्जातंतूंचा त्रास जसे की, चेहऱ्‍याचा पक्षाघात (Facial Palsy), मज्जातंतूच्या त्रासामुळे चेहऱ्‍यावर होणारी जळजळ (Trigeminal Neuralgia) यासाठी डेंटल लेझर उत्तम पद्धतीने काम करते. दातांचे रूटकॅनॉल ट्रीटमेंट ही तर सर्वसाधारणपणे केली जाणारी उपचारपद्धती आहे. यामध्ये सुद्धा लेझर वापरल्यास दातांच्या मुळांचे योग्य प्रकारे निर्जंतुकीकरण करता येते. परिणामी, वारंवार अ‍ॅंटिबायोटिक्स पद्धतीची औषधे घ्यावी लागत नाहीत.

Dental Laser
Computer Vision Syndrome : कॉम्प्युटरचे दृष्टिदोष टाळा अन् 20-20-20 चा नियम पाळा

आजच्या घडीला आधुनिक पद्धतीने दंतरोपण करून (Dental Implant) दात बसवण्याचे प्रमाण वाढले आहे; पण अशा कृत्रिम दाताभोवती जर इन्फेक्शन झाल्यास ते लेझरद्वारे अगदी सहजरित्या बरे करता येते. लेझरद्वारे दंत उपचारपद्धती करताना त्याचे काहीही दुष्परिणाम होत नाहीत. त्यामुळे फक्त फायदेच फायदे होतात. नो इन्फेक्शन, नो पेन, नो ब्लडिंग अशा अनेक गुणांनी संपन्न लेझरद्वारे दंत उपचारपद्धती करणे अगदी सहजसोपे झाले आहे.

(लेखक डॉ. स्वस्तिक हॉस्पिटल, रत्नागिरी येथे दंतविकार व हिरडी शल्यचिकित्सकतज्ज्ञ आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com