esakal | कोरोना रुग्णांसाठी संजीवनी ठरलेलं मोस्ट वाँटेड 'रेमडेसिव्हीर' आहे तरी काय?
sakal

बोलून बातमी शोधा

Remdesivir corona

या औषधासाठी सध्या मेडीकलसमोर मोठमोठाल्या रांगा लागल्याचं चित्र आहे. तर ते न मिळाल्याने रुग्णाच्या नातेवाईकांचे हंबरडे ऐकू येत आहेत.

कोरोना रुग्णांसाठी संजीवनी ठरलेलं मोस्ट वाँटेड 'रेमडेसिव्हीर' आहे तरी काय?

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : देशात कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा धुमाकूळ घालायला सुरूवात केली असून महाराष्ट्र राज्यात तर कोरोनाचा हाहाकार पहायला मिळतो आहे. या पार्श्वभूमीवर सध्या पुन्हा एकदा राज्यात संपूर्ण लॉकडाऊनचे संकेत दिले जात आहेत. सध्या कोरोनाच्या रुग्णांसाठी संजीवनी ठरलेले रेमेडीसिव्हीर या औषधाची मागणी  प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मात्र, या औषधाचा सध्या तुटवडा जाणवत आहे. औषधाच्या वाढत्या मागणीमुळे अनेक ठिकाणी या औषधासाठी रांगाच्या रांगा लागत असल्याची परिस्थिती आहे. या औषधावाचून अनेक रुग्णांचा प्राण जात असल्याच्या घटना घडत आहेत. या औषधासाठी सध्या मेडीकलसमोर मोठमोठाल्या रांगा लागल्याचं चित्र आहे. तर ते न मिळाल्याने रुग्णाच्या नातेवाईकांचे हंबरडे ऐकू येत आहेत. एकीकडे ही दुर्दैवी परिस्थिती असताना हे औषध चढत्या भावाने विकलं जात असून त्याची साठेबाजी आणि काळाबाजार देखील होत असल्याच्या घटना घडत आहेत. प्राप्त परिस्थितीत देशाला या औषधाची गरज सर्वांत जास्त आहे. हे लक्षात घेता केंद्र सरकारने आता रेमेडेसिव्हीर औषधाची परदेशातील निर्यात थांबवली आहे. देशातील परिस्थिती जोवर सुधारत नाही तोवर या इंजेक्शनच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. मात्र काय आहे हे रेमडेसिव्हीर औषध आणि का वाढलीय त्याची इतकी माहिती याबद्दल आपण माहिती घेऊयात...

हेही वाचा - ब्रेकिंग : देशात 'रेमेडीसिव्हीर'चा प्रचंड तुटवडा; अखेर केंद्राकडून निर्यातीवर बंदी

काय आहे हे औषध?
याआधी जगामध्ये जेंव्हा इबोला आणि सार्स या विषाणूंची साथ आलेली होती तेव्हा त्या विषाणूला रोखण्यासाठी म्हणून रेमडेसिव्हिर या औषधाची निर्मिती केली गेली होती. हे सुद्धा एक अँटी व्हायरल ड्रग आहे. अमेरिकेच्या एका औषध निर्मिती करणाऱ्या या ड्रगची निर्मिती केली होती. गिलियाड असं या कंपनीचं नाव आहे. मर्स, सार्स आणि इबोलासारख्या विषाणूंना आळा घालण्यासाठी या औषधाचा उपयोग झाला मात्र तो म्हणावा तितका झाला नसल्याचं तज्ज्ञ सांगतात. तेंव्हा फार यशस्वी न ठरलेलं रेमडेसिव्हीर आता मात्र 'मोस्ट वाँटेड' ड्रग ठरत आहे. SARC-CoV-2 या कोरोना विषाणूविरोधात याचा प्रभावी वापर होत असल्याचं निदर्शनास आलं आहे. 

काय करतं हे ड्रग?
कोरोना विषाणूची बाधा झालेल्या रुग्णाच्या शरीरामध्ये हे ड्रग दिल्यानंतर त्याच्या शरीरात असलेल्या अशा एन्झायम्सवर हे ड्रग हल्ला करतं ज्यामुळे या कोरोना व्हायरसला एकापासून दोन व्हायला मदत मिळते. गिलिएड सायन्सेसच्याने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाबाधित रुग्णाला या ड्रगचा पाच दिवसांचा कोर्स करावा लागतो. थोडक्यात रुग्णाला सहा बाटल्या रेमडिसिव्हीर द्याव लागतं. रेमडीसिव्हीर कोरोना रुग्णासाठी संजिवनी ठरणारं असलं तरीही या ड्रगचे काही साईड इफेक्ट देखील होऊ शकतात. जसे की जेवणावरची वासना उडणे, श्वाशोच्छवासास त्रास होणे, काही रुग्णांच्या जठराला सूज येणे हे आणि असे काही साईड इफेक्ट होऊ शकतात. भारतात गेल्या मे महिन्यामध्ये रेमडेसिव्हीर हे औषध लाँच करण्यात आलं. सिप्ला आणि हेटरो लॅब्सने पाच हजारांच्या आसपास हे औषध बाजारात आणलं होतं. रुपये चार हजारपासून ते रुपये पाच हजार पाचशेपर्यंत या औषधाची किंमत होती. मात्र, हे ड्रग म्हणजे काही कोरोनावरचा रामबाण उपाय नाहीये. काहीअंशीच प्रभावी असलेल्या या औषधाची सध्या मोठी मागणी आहे. 

हेही वाचा - VIDEO: 'कोरोना देशातून निघून जा'; मंत्र्याने एअरपोर्टवर केली पूजा

भारतात निर्यातीवर बंदी 
देशात या औषधाच्या वाढत्या मागणीमुळे आता केंद्र सरकारने या औषधाच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा आदेश जाहीर केला आहे. रेमडेसिव्हीरच्या देशातील सर्व उत्पादकांनी त्यांच्या वेबसाइटवर, त्यांच्या स्टॉकिस्ट / वितरकांचे तपशील देण्याचा सल्ला केंद्राने दिला आहे, जेणेकरुन हे औषध मिळण्यात सहजता यावी.

ड्रग्ज इन्स्पेटक्टर आणि इतर अधिकाऱ्यांना साठे पडताळणीचे आदेश दिले गेले आहेत. तसेच त्याच्या काळ्याबाजारास आळा घालण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश केंद्राने दिले आहेत. आगामी काळात रेमेडीसिव्हिर इंजेक्शनच्या मागणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. रेमडेशिव्हरचे उत्पादन वाढवण्यासाठी औषधनिर्माण विभाग देशांतर्गत उत्पादकांशी संपर्क साधत आहे.
 

loading image
go to top