Health: बीयर, वाइन पिताय? फक्त प्रमाण लक्षात घ्या, योग्य प्रमाण अन् हेल्थ राहिल एकदम ओके... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Healthy Drinks For Body

Health: बीयर, वाइन पिताय? फक्त प्रमाण लक्षात घ्या, योग्य प्रमाण अन् हेल्थ राहिल एकदम ओके...

अनेकांना रोज ड्रिंक करण्याची सवय असते. कोणाला वाइन प्यायची सवय तर कोणाला साधा लेमन ज्यूस पिण्याची सवय असते. मात्र स्टडी काय सांगते ते तुम्हाला ठाऊक आहे काय?

एका स्टडीनुसार असं लक्षात आलं आहे की, रेड वाईन पिणाऱ्यांमध्ये एखादा आजार झाल्यास त्यांच्या शरीरातील ब्लड वेसल्समध्ये होणाऱ्या धोक्यापासून रेड वाइन तुमचा बचाव करतं. हाय कोलेस्ट्रॉल, कँसर यांसारख्या समस्यांपासूनही तुमचा बचाव करण्यासाठी रेड वाईनची मदत होते. Rasversatrol हे एक प्रकारचं केमिकल आहे ज्याचा उपयोग औषध बनवण्यासाठीही केला जातो.

बीयर

अनेक स्टडीमध्ये असेही निदर्शनास आले आहे की, बीयर डायमेंशिया म्हणजेच विसरण्याच्या आजारापासून तुमचं रक्षण करते. अनेक रिसर्चमध्ये असा दावा केला गेलाय की बीयर प्यायल्याने हृदय संबंधित रोगांचा धोका कमी होतो. काही प्रकारच्या बीयरमध्ये कॅलरी जास्त प्रमाणात असतात त्यामुळे त्याने तुमचं वजनही वाढू शकतं.

पाइन अॅप्पल ज्यूसमध्ये विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असतात. या घटकांमुळे डोळ्यांचं तेज वाढण्यास मदत होते. यातील विटॅमिन सी, फायबर, पोटॅशिअमही बघितल्या जातं ज्याने शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढते. पाईन अॅप्पलचा ज्यूस पिल्याने डायजेशन इम्प्रूव होतं. तसेच अनेक प्रकारच्या इन्फेक्शनपासूनही तुमचा बचाव होतो.

हेही वाचा: Health: High Cholesterol असेल तर हलक्यात घेऊ नका, पुरुषांमध्ये नपुंसकता येण्याचं हे महत्वाचं कारण

टोमॅटो ज्यूस

टमाटरमध्ये अनेक प्रकारचे पोषक तत्व असतात. दिवसभऱ्यातून एकदा टमाटरचा रस पिल्याने स्तन कँसरचा धोका कमी होतो.

चहा

चहाच योग्य प्रमाण शरीराला फायदा देतं. तुम्ही दुधाचा चहा न घेता कोरा चहा, ग्रीन टी किंवा व्हाइट टी घेत असाल तर अति उत्तम. यामुळे हृदय रोग, डायबिटीज आणि डोकेदुखी यांसारख्या त्रासातून तुमची सुटका करतील.

हेही वाचा: Health : तुमचेही वजन वाढलंय का? हे पदार्थ खा, ज्याने कॅलरीज वाढणार नाहीत!

अल्कोहोलिक ड्रिंक्स घेताना घ्या विशेष काळजी

वरील माहितीमध्ये अल्कोहोलिक आणि नॉन अल्कोहोलिक अशा दोन्ही प्रकारच्या ड्रिंक्सची माहिती दिली आहे. मात्र जर का तुम्ही अल्कोहोलिक ड्रिंकचं सेवन अतिप्रमाणात केलं तर तुम्हाला ते धोक्याचं ठरू शकतं. महिलांनी दिवसातून १५० मिली म्हणजेच अगदी लहान ग्लास एवढं अल्कोहोल घ्यावं तर पुरुषांनी ३०० मिली म्हणजेच दोन ग्लासच्यावर एका दिवसात अल्कोहोल घेऊ नये.