Homemade Protein Powder : घरच्या घरी बनवा वजन कमी करण्यास उपयुक्त प्रोटिन पावडर!

प्रसिद्ध भारतीय शेफ तरला दलाल यांनी वजन कमी करण्‍यासाठी ही सोपी रेसिपी दिलीय
Homemade Protein Powder
Homemade Protein Powder Esakal

आजकाल लोक तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी दिवसभराच्या कामातून वेळ काढून लोक जिमला जातात. ट्रेनर्स जिममध्ये जाणाऱ्या लोकांना प्रोटीन पावडर घेण्यास सांगतात. कारण ते अधिक ऊर्जेचा स्रोत आहे. लोक प्रोटीन पावडर ऑनलाइनही खरेदी करतात.

तुम्हाला माहित आहे का की हे आरोग्यदायी पद्धतीने घरी बनवता येते. प्रोटीन पावडर विकत घेणे तसे परवडणारे नसते. इंस्‍टाग्रामवर प्रसिद्ध भारतीय शेफ तरला दलाल यांनी वजन कमी करण्‍यासाठी ही सोपी व्हेजिटेरियन प्रोटीन पावडरची रेसिपी शेअर केली आहे. ती कशी बनवायची हे पाहुयात.

Homemade Protein Powder
Weight Loss : दररोज पनीर खा झटक्यात होणार वजन कमी; वाचा, कसं?

प्रोटीन पावडरसाठी लागणारे साहित्य

1 कप बदाम, 1/2 कप अक्रोड, 1/2 कप कच्चे शेंगदाणे, 1/4 कप पिस्ते, 1/4 कप काजू, 2 टेबलस्पून टरबूजच्या बिया, 2 टेबलस्पून भोपळ्याच्या बिया, 2 टेबलस्पून सूर्यफूल बिया, 1/4 कप बारीक चिरून वाळवलेले खजूर

Homemade Protein Powder
Wedding Muhurat 2023 : लग्नाळुंसाठी नवं वर्ष जाणार आनंदाचं! तब्बल आठ महिने असणार मुहूर्त!

कृती

होममेड व्हेज प्रोटीन पावडर बनवण्यासाठी, एक रुंद नॉन-स्टिक पॅन गरम करा आणि बदाम मध्यम आचेवर तीन ते चार मिनिटे कोरडे भाजून घ्या. यानंतर एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून त्याच तव्यावर अक्रोड, शेंगदाणे, पिस्ते आणि काजू एकामागून एक मध्यम आचेवर दोन ते तीन मिनिटे भाजून घ्या आणि ताटात वेगळे काढा.

खरबूज, भोपळा, सूर्यफुल आणि आणि जवसाच्या बिया मध्यम आचेवर दोन ते तीन मिनिटे परतून घ्या. हे सर्व पदार्थ थंड झाले की, त्यात चियाच्या बिया आणि कोरडे खजूर घालून बारीक पूड करून घ्या.

Homemade Protein Powder
Gas-Acidity Remedy : न्यू इयर सेलिब्रेशनमध्ये खूप खाऊन झालीय ॲसिडीटी? 'हे' उपाय करा; त्रास लगेच दूर पळेल

कधी घ्यावी प्रोटीन पावडर

पावडर बनवून झाल्यावर ती केवळ डब्यात बंद करून ठेवू नका. रोज सकाळी एका ग्लासभर कोमट दूधात तीन चमचे प्रोटीन पावडर घाला आणि ग्लास फस्त करा. चव गोड बनवण्यासाठी तुम्ही त्यात एक ते दोन चमचे मध देखील घालू शकता.

Homemade Protein Powder
Carrot Juice : वजन नियंत्रित ठेवायचंय? दररोज एक ग्लास प्या गाजराचा ज्युस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com