

Sleep and Brain Development: Why Rest is Crucial for Growing Children
Sakal
डॉ. संजय जानवळे, बालरोगतज्ज्ञ
कुठल्याही वयातल्या मुलांना झोपेच्या समस्या असू शकतात. एका वर्षाखालील मुलांत चांगल्या झोपेचा दैनंदिन नित्यक्रम तयार होणं अवघडच. नुकतेच चालायला लागलेले मुल किंवा शालेयपूर्व वयोगटातील मुलं रात्री लवकर झोपतच नाहीत. पौगंडावस्थेतील मुलांच्या झोपेच्या समस्यांचं स्वरूप वेगळंच आहे. रात्री नीट झोप न झालेलं मूल दिवसा पेंगुळलेलं असतं, डुलक्या घेत राहतं. अपुऱ्या झोपेचा परिणाम मुलांच्या वर्तणुकीवर होत असतो. दिवसा झोप येणं, हे झोपेच्या समस्या असल्याचं चिन्ह असून त्यासाठी वैद्यकीय सल्ला घेणं श्रेयस्कर ठरतं. लहान मुलांच्या बौद्धिक विकासासाठी चागंली झोप महत्त्वाची असते. लहान मुलांत प्रौढांपेक्षा झोपेचे प्रमाण जास्त असते. या काळात मेंदूचा विकास झपाट्याने होत असतो. चांगली झोप चांगल्या विकासासाठी अनिवार्य आहे.