Jalgaon Crime News : दोघा अट्टल गुन्हेगारांवर एमपीडीए अंतर्गंत कारवाई

Jalgaon Crime News : दोघा अट्टल गुन्हेगारांवर एमपीडीए अंतर्गंत कारवाई
esakal

Jalgaon Crime News : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी जिल्‍हा व पोलिस प्रशासनाने प्रतिबंधात्मक कारवाईचा सपाटा सुरु केला आहे.

भुसावळ तालुका पोलीस ठाणे आणि चोपडा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन गुन्हेगारांना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्थानबद्ध करण्याचे आदेश पारित केले आहेत.

इब्राहीम उर्फ टिपू उर्फ टिप्या सत्तार मण्यार (रा. वराडसीम, भुसावळ) आणि आकाश संतोष भोई (रा. साने गुरुजी वसाहत, चोपडा) असे स्थानबद्ध करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. (Action under MPDA against 2 criminals jalgaon news)

इब्राहीम उर्फ टिपू याच्याविरुद्ध भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात ३, एमआयडीसी पोलीस ठाण्यात २, तर फैजपुर आणि शनीपेठ पोलिस ठाण्यांत प्रत्येकी एक असे एकूण ७ गुन्हे दाखल आहेत.

भुसावळ तालुका पोलिसांनी त्याच्याविरुद्ध दोन वेळा प्रतिबंधात्मक कारवाई केलेली आहे. तरीदेखील त्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीत कोणताही बदल न झाल्याने त्याची येरवडा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

दरम्यान, चोपडा शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आकाश संतोष भोई याच्याविरुद्धदेखील सात गुन्हे दाखल आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Jalgaon Crime News : दोघा अट्टल गुन्हेगारांवर एमपीडीए अंतर्गंत कारवाई
Crime News : पत्रकाराच्या हत्येनंतर आणखी एका साक्षीदाराची हत्या; निवृत्त शिक्षकावर झाडल्या गोळ्या

तसेच, अदखलपात्र गुन्हे, प्रतिबंधात्मक कारवाईदेखील करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्धही चोपडा शहर पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडे प्रस्ताव पाठविला होता.

त्या प्रकरणीही जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानबद्धतेचे आदेश दिले. त्यानुसार चोपडा पोलिसांनी ताब्यात घेवून त्याला नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली. या कारवाईकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्यासह त्यांचे सहकारी आणि संबंधित पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी यांनी सहकार्य केले.

Jalgaon Crime News : दोघा अट्टल गुन्हेगारांवर एमपीडीए अंतर्गंत कारवाई
Jalgaon Crime : सिव्हीलपासून जेलपर्यंत चपलेतून गांजा तस्करी! जेलच्या गेटवर तपासणीत आढळला गांजा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com