Gold Silver Price Updates
Gold Silver Price Updatesesakal

Akshaya Tritiya 2023 : अक्षयतृतीयेच्या मुहूर्ताला सोनेविक्रीत 30 टक्के घट

Jalgaon News : जळगावची सुवर्ण बाजारपेठ अस्सल, शुद्ध सोन्यासाठी प्रसिद्ध आहे. भारतीय सण, उत्सवात, सर्वच शुभ मुहूर्तावर येथे सोनेविक्री विक्रमी होते. (Akshaya Tritiya 2023 30 percent decrease in gold sales jalgaon news)

या वर्षी मात्र सोनेविक्रीत पंधरा ते तीस टक्के घट झाल्याचे सुवर्ण व्यावसायिकांनी सांगितले. सोन्याच्या दरात झालेली वाढ, महिन्याच्या शेवटी आलेली अक्षयतृतीया, आगामी काळात सोने स्वस्त होईल, अशी बाजारात असलेली स्थिती याला कारणीभूत असल्याचे सांगण्यात आले.

सोने, चांदीमध्ये केलेली गुंतवणूक ही लागलीच रोकड देणारी मानली जाते. सोने, चांदीचे दागिने विकले, की मिळालेल्या पैशांतून नागरिक आपली आर्थिक गरज पूर्ण करतात. यामुळे सोन्यात दर वर्षी गुंतवणूक वाढत आहे.

नवीन वर्षात सोने, चांदी बाजारात तेजीचे वातावरण आहे. जानेवारीत सोन्याच्या दरात पंधराशे रुपयांची, तर चांदीच्या दरात एक हजारांची वाढ झाली होती. तेव्हा सोन्याचा दर ‘जीएसटी’सह ५८ हजार ८०० वर पोचला होता. चांदीचा दर ‘जीएसटी’सह ७२ हजार १०० वर पोचला होता. शहरी भागातील महिला सोन्यातील गुंतवणूक अधिक फॅशन म्हणून सोन्याकडे पाहतात.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Gold Silver Price Updates
Akshay Tritiya : शुभ मुहूर्तावर ‘सोनेरी’ झळाळी; दरात वाढ तरी खरेदीसाठी गर्दी!

भारतातील एकूण सोन्याची वार्षिक मागणी एक हजार १०० ते एक हजार २०० टन एवढी आहे. त्यापैकी ५५ ते ६० टक्के खप हा ग्रामीण भागात होतो. १३ एप्रिलला सोन्याचा दर ६० हजार पाचशे प्रतितोळा (विनाजीएसटी) होता. चांदी ७५ हजार रुपये प्रतिकिलो होती. १४ एप्रिलला सोन्याच्या दरात ९०० रुपयांची वाढ झाली. यामुळे ‘जीएसटी’सह सोने ६३ हजार २४२ वर पोचले होते.

शुक्रवारी (ता. २१) सोने विनाजीएसटी ६० हजार ६०० रुपये होते. जीएसटीसी ६२ हजार ४१८ पर्यंत खाली आले. अवघ्या सात दिवसांत आठशे रुपयांची घसरण सोन्यात झाली. आज सोन्याचा दर ६० हजार ३००, तर ‘जीएसटी’सह ६२ हजार १०९ होता. अक्षयतृतीयेच्या दिवशी घेतलेले सोने अक्षय्य टिकते, असे म्हटले जाते. असे असले तरी वाढलेले सोन्याचे दर सोने खरेदीकडे सर्वसामान्यांना जाऊ देत नसल्याचे चित्र होते.

गत वर्षीच्या तुलनेत दहा हजारांची वाढ

गत वर्षी २०२२ ला सोन्याचे दर ५० हजार ८३९ होते. यंदा २०२३ सोन्याचे दर ६० हजार ३०० (विनाजीएसटी) आहेत. तब्बल नऊ हजार ४६१ रुपयांची वाढ सोन्यात झाली होती.

"अक्षयतृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त. या दिवशी सोने खरेदीला चांगला प्रतिसाद असतो. या सणाला ग्रामीण भागातील नागरिक खरेदीस येत नाहीत. शहरी भागातून प्रतिसाद असतो. यंदा दहा ते पंधरा टक्के सोने विक्रीत घट दिसते. रात्री उशिरापर्यंत चित्र स्पष्ट होईल."- सुशील बाफना, संचालक- रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स

Gold Silver Price Updates
Akshaya Tritiya 2023 : पिंप्राळ्यात बारागाड्या ओढण्याचा उत्साह...! ‘भवानी माता की जय’चा जयघोष

"महिलांची म्युअर दागिन्यांना मागणी होती. मणीमंगळसूत्र, नेकलेस, हार, अंगठी, कानातील डुल, बांगड्या आदी दागिन्यांना मागणी होती. सोन्याच्या वाढलेल्या दरामुळे गत वर्षीपेक्षा तीस टक्के सोने विक्रीत घट झाली आहे. लग्नसराई नाही, कडक उन्ह, सणाचा दिवस यामुळे ही घट आहे." -आदित्य नवलखा, संचालक- नवलखा ज्वेलर्स

गेल्या काही दिवसांतील सोने, चांदीचे दर असे (विनाजीएसटी)

तारीख -- सोने प्रतितोळे -- चांदी प्रतिकिलो

२८ जानेवारी -- ५७ हजार ४०० -- ६९ हजार

१ फेब्रुवारी - ५७ हजार ४०० -- ६९ हजार

२६ फेब्रुवारी -- ५५ हजार ९०० -- ६५ हजार ५००

१८ मार्च -- ५९ हजार ३०० -- ६९ हजार

१७ एप्रिल -- ६० हजार ३०० -- ७५ हजार

२१ एप्रिल -- ६० हजार ६०० -- ७५ हजार

२२ एप्रिल -- ६० हजार ३०० -- ७५ हजार

Gold Silver Price Updates
Akshaya Tritiya : सोने ‘दरवाढी’चा विक्रीवर परिणाम; घरे बुकींगला प्रतिसाद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com