Jalgaon News : महापालिकेचा अतिक्रमणावर हातोडा; फुले मार्केटमध्ये लोखंडी रॅक जप्त

120 encroachments in Chalisgaon were removed jalgaon news
120 encroachments in Chalisgaon were removed jalgaon newsesakal

Jalgaon News : शहरातील अतिक्रमणावर महापालिका अतिक्रमण निर्मूलन पथकाने सोमवारी (ता. २९) धडक कारवाई केली. फुले मार्केटमधील सर्व अतिक्रमण हटवून दहा लोखंडी रॅक व हातगाड्या जप्त केल्या. (All encroachments in Phule market were removed and ten iron racks and handcart were confiscated jalgaon news)

चित्रा चौक ते न्यायालय चौकापर्यंत सर्व फळविक्रेत्यांच्या हातगाड्या जप्त करून फळे अनाथआश्रम, रिमांड होममध्ये वाटप केले. आता ही मोहीम सलग सुरू राहणार असल्याचे महापालिकेतर्फे सांगण्यात आले.

शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे. अगदी वाहने चालविण्यासाठीही जागा शिल्लक राहत नाही. फुले मार्केटच्या अतिक्रमणाचा नेहमीचाच प्रश्‍न आहे. त्याठिकाणीही ग्राहकांना पाय ठेवण्यासाठी जागा राहत नाही. अतिक्रमण हटविण्याबाबत अनेक वेळा तक्रार करूनही महापालिकेचे अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत.

‘सकाळ’ने याबाबत सोमवारी ‘हॉकर्स जागा अन्‌ महापालिका ‘हप्ता’ सोडायला तयार नाही’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करताचा महापालिकेचे अधिकारी जागे झाले व त्यांनी धडक कारवाईस सुरवात केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

120 encroachments in Chalisgaon were removed jalgaon news
Sakal Special News : सावली ऑक्सिजन देणाऱ्या वड कडुनिंब पिंपळाला जपा; आयुर्वेदचार्यांचा सल्ला

महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने थेट फुले मार्केटमध्येच धडक मारली. तेथील अतिक्रमणधारकांच्या गाड्या जप्त केल्या, तर सामान ठेवण्यासाठी असलेले लोखंडी रॅकही जप्त केले. त्यामुळे अतिक्रमणधारकांची तारांबळ उडाली. अनेक अतिक्रमणधारक हातेगाड्या पळवून घेऊन गेले.

पोलिसाविना कारवाई

फुले मार्केट व सेंट्रल फुले मार्केटमध्ये कारवाई करताना महापालिका नेहमी पोलिस बंदोबस्ताचे गाऱ्हाणे सांगते. मात्र, सोमवारी त्यांनी कोणताही पोलिस बंदोबस्त न घेता प्रथमच धडक कारवाई करून गाड्या जप्त केल्या.

अतिक्रमणधारक व अतिक्रमणविरोधी कर्मचारी यांच्यात वादही झाले. मात्र, ते आज महापालिका कर्मचाऱ्यांनी त्याला विरोध करीत कारवाई सुरूच ठेवली. त्यामुळे दुपारी फुले मार्केट व सेंट्रल फुले मार्केटमधील सर्व अतिक्रमण साफ झाले होते. या ठिकाणी ग्राहकांना चालण्यासही जागा मोकळी झाली होती.

120 encroachments in Chalisgaon were removed jalgaon news
BJP Metting News : स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकींसाठी सज्ज राहा : डॉ. विजयकुमार गावित

कॉंग्रेस भवनासमोरही कारवाई

महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने कॉंग्रेस भवनासमोरील व जैन मंदिरासमोरील अतिक्रमणधारकांवरही कारवाई केली. तेथील कापड विक्रेत्यांच्या गाड्याही जप्त केल्या.

फळविक्रेत्यांच्या गाड्या जप्त

चित्रा चौक ते न्यायालय चौकादरम्यान रस्त्यावरील अतिक्रमणही काढले. गोलाणी मार्केटशेजारील हनुमान मंदिराजवळील अतिक्रमणाच्या गाड्याही जप्त केल्या. फळासह या गाड्या जप्त करण्यात आल्या. या गाड्या हटविल्यामुळे रस्ता मोकळा झाला होता.

महिनाभर धडक कारवाई

अतिक्रमण निर्मूलनाची ही कारवाई महिनाभर सुरूच राहणार असल्याचे अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. शहरातील सर्वच भागांत अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात येणार आहे.

120 encroachments in Chalisgaon were removed jalgaon news
Cotton Rate News : शेतकऱ्यांना मिळणार वाजवी दरात कापूस बीटी बियाणे

फुले मार्केटमध्येही आता कोणत्याही प्रकारे अतिक्रमण होऊ दिले जाणार नाही. त्या ठिकाणी सकाळी दहापासून कायमस्वरूपी कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत, असे सांगण्यात आले.

फळे रिमांड होममध्ये वाटप

महापालिका अतिक्रमण निर्मूलन विभागाने जप्त केलेले फळे रिमांड होममधील मुले, महापालिकेच्या बेघर अनाथ आश्रमातील नागरिक व गोशाळेत वाटण्यात आली.

"महापालिकेतर्फे अतिक्रमण हटविण्याची कारवाई शहरातील सर्वच भागांत करण्यात येईल. यात अतिक्रमणधारकांच्या गाड्या जप्त करण्यात येतील." -उमेश नष्टे, अधीक्षक, अतिक्रमण निर्मूलन विभाग महापालिका

120 encroachments in Chalisgaon were removed jalgaon news
Jalgaon News : गटारी बांधण्याचे 10 कोटी महिन्यात संपले; मनपाची कार्यतत्परता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com