Jalgaon News : फळबाग लागवड योजनेचा लाभ घेण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

Jalgaon News : फळबाग लागवड योजनेचा लाभ घेण्याचे शेतकऱ्यांना आवाहन
sakal

Jalgaon News : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना २०२३-२४ अंतर्गत जळगाव जिल्ह्यास एकूण २५०० हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्याचे लक्षांक प्राप्त झाले आहे. या योजनेत फळबाग लागवड व फुलपिके लागवडीचा लाभ घेण्यासाठी इच्छुक पात्र शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. (Appeal to farmers to take advantage of orchard planting scheme jalgaon news)

या योजनेतंर्गत कमीत कमी ०.०५ हेक्टर ते जास्तीत जास्त २.०० हेक्टर क्षेत्रावर इच्छुक लाभार्थ्यांना लागवडीचा लाभ देण्यात येणार आहे. अनुसूचीत जाती, अनुसूचीत जमाती, भटक्या जमाती, निरधी सूचित जमाती, दारिद्य रेषेखालील कुटुंब, स्त्री कुटुंब प्रमुख असलेले कुटुंब, जमीन सुधारणाचे लाभार्थी, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण योजनेंतर्गत लाभार्थी, अनुसुचित जमातीचे व इतर पारंपारीक वनवासी अधिनियम २००६ मधील पात्र लाभार्थी आदी या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत.

इच्छुक शेतकऱ्यांकडे ७/१२ उतारा, ८-अ उतारा, मजूर कार्ड (जॉबकार्ड) आदी कागदपत्रे, तसेच ग्रामपंचायतीने मान्य केलेल्या लाभार्थी यादीत नाव असणे व प्रपत्र अ व प्रपत्र ब (फळबागेचे कार्य ग्रामपंचायत किंवा कृषि विभाग यापैकी कोणाकडून राबविण्यात रस आहे याचा स्पष्ट उल्लेख असावा) सादर करणे बंधनकारक आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Jalgaon News : फळबाग लागवड योजनेचा लाभ घेण्याचे शेतकऱ्यांना आवाहन
Gulabrao Patil : पोकरा योजना ठरतेय शेतकऱ्यांसाठी वरदान : पालकमंत्री पाटील

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण फळबाग लागवड योजनेंतर्गत केळी, आंबा, चिकू, पेरू, बोर, सिताफळ, कागदी लिंबू, डाळींब, आवळा, सिताफळ, मोसंबी आदी फळपिके व गुलाब, मोगरा, निशीगंध, सोनचाफा आदी फुलपिके लागवडीचा लाभ देण्यात येतो.

या योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक पात्र लाभार्थ्यांने विहीत नमुन्यातील अर्ज (प्रपत्र- अ) व संमती पत्र (प्रपत्र ब) ऑफलाईन पद्धतीने आपल्या गावातील ग्रामपंचायत किंवा संबंधित कृषि सहाय्यक/तालुका कृषि अधिकारी कार्यालय यांच्याकडे सादर करावे. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी केले आहे.

Jalgaon News : फळबाग लागवड योजनेचा लाभ घेण्याचे शेतकऱ्यांना आवाहन
Farmer : हलगर्जीपणाची हद्दच झाली! 4 वर्षापूर्वी नाफेडला विकलेल्या हरभऱ्याचे पैसे अजुनही मिळेना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com