Jalgaon Crime News : रिक्षाचालकास धमकावल्याने ॲट्रॉसीटी दाखल; एटीएम कार्डसह कागदपत्र हिसकाविले

Beating News
Beating Newsesakal

Jalgaon Crime News : भाडेतत्त्वावर दिलेल्या रिक्षाचा अपघात झाल्यानंतर शिवाजीनगर येथील चालकाला धमकावून त्याचे एटीएम कार्ड व इतर दस्तऐवज घेऊन बँक खात्यातील रक्कम काढणे व नंतरही धमकावल्याची घटना घडली.

याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. (Atrocity crime for threatening rickshaw driver jalgaon crime news)

योगिता जितेंद्र ठाकूर (वय ३४, रा. नवीन घरकूल, शिवाजीनगर) यांनी याबाबत शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार त्यांच्या पतीला दीपककुमार गुप्ता (रा. शिवाजीनगर, हुडको) यांनी भाडेतत्वावर रिक्षा चालविण्यासाठी दिली होती. ही रिक्षा व पतीचा अपघात झाल्यापासून रिक्षा चालविणे बंद होते.

परिणामी रिक्षाच्या कर्जाचे हप्ते परतफेड करण्यासाठी गुप्ता यांनी ८ ऑगस्टला दुपारी साडेबाराच्या सुमारास पतीला धमकावून एटीएम कार्ड व इतर दस्तऐवज घेऊन त्यांच्या खात्यातून परस्पर रक्कम काढली व रोख रक्कमही घेतली. त्यानंतरही पैशाचा तगादा लावून धमकावत असे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Beating News
Jalgaon Crime News : डॉक्टरकडे उपचारासाठी आलेल्या महिलेचा विनयभंग

तसेच, पतीला मारहाण करून दोघांनाही जातीवाचक शिवीगाळ करीत पैसे भरावेच लागतील, पैसे कसे वसूल करायचे ते मला चांगले माहित आहे, तुम्ही पैसे भरले नाही तर तुम्हाला परत जंगलात पाठवेल व तुमचे घर जप्त करेल, अशी धमकी देत असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार दीपककुमार गुप्ता यांच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित तपास करीत आहेत.

"तक्रारदार महिलेची सासु मिराबाई यांनी, २०१४ मध्ये मुलगा बेरोजगार असल्याने व्यसनाधीन होत असून तुमचे ऑटोरिक्षाचे परमिट मिळाले तर, कुटूंबाला अधार मिळेल अशी विनंती केली होती. त्यावरून आपण जितेंद्र ठाकूर याला रिक्षाचे परमीट दिले होते.

त्याने त्या परमीटवर कर्ज काढून रिक्षा घेतली. नंतर हप्ते फेडत नसल्याने ती जमा झाली. आता कर्ज माझ्या नावे मंजुर झाल्याने वन-टाईम सेटलमेंटसाठी माझे प्रयत्न सुरु होते. मात्र, त्या मंडळींना पैसेच भरायचे नाहीत. त्यामुळे त्यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे." -दीपककुमार गुप्ता, परवानाधारक

Beating News
Jalgaon Bribe Crime : ‘चोपडा ग्रामीण’चा सहाय्यक फौजदार लाच घेताना जाळ्यात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com