Sakal Impact : अखेर केळी विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात; उत्पादकांना मेसेज प्राप्त

Sakal-Impact
Sakal-Impactsakal

Sakal Impact : अखेर जिल्ह्यातील काही केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात शनिवारी (ता.११) सकाळपासून केळी पीकविम्याची भरपाईची रक्कम येण्यास सुरवात झाली आहे.

तशा आशयाचे मेसेज शेतकऱ्यांना प्राप्त होत असून, येत्या दोन दिवसांत टप्प्याटप्प्याने सुमारे ५५ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर भरपाईची रक्कम जमा होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.(banana insurance amount in farmers account jalgaon news)

याबाबत एकीकडे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असले तरी दुसरीकडे बँकांना २ दिवस सुट्टी असल्याने दिवाळीत ही रक्कम वापरता येणार नसल्याचे दुःख व्यक्त होत आहे.

केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या पीकविम्याची रक्कम १५ सप्टेंबरपर्यंत मिळणे अपेक्षित होते; मात्र विमा कंपनीने वेगवेगळे कारण सांगत भरपाई देणे टाळले आहे. राज्य शासनाचा आणि केंद्र शासनाचा विमा कंपनीला मिळणारा हप्ताच मिळाला नसल्याचे कारण सुरवातीला सांगण्यात आले होते.

नंतर मागील वर्षीपेक्षा खूपच जास्त केळी उत्पादक शेतकऱ्यांनी विमा काढल्याचे कारण सांगत विमा काढलेल्या क्षेत्रावरच विमा कंपनीने शंका घेतली होती. केळी कापणी झाल्यावर सॅटेलाईट सर्वेक्षण कसे होणार, असाही प्रश्न निर्माण झाला होता.

५५ हजार केळी उत्पादकांना विमा मंजूर करण्यात आल्याचे सांगण्यात येत होते. पण त्यांना ही भरपाई मिळत नव्हती. अन्य सुमारे ३० हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना विमा मिळण्याचा प्रश्न प्रलंबितच आहे.

Sakal-Impact
SAKAL Impact: नायगाव खोरे भागात नाईट व्हिजन ड्रोन कॅमेऱ्याने केला सर्व्हे; 6 पिंजऱ्यांची आज तत्काळ उभारणी

याबाबतचे वृत्त ‘सकाळ’ ने वेळोवेळी रोखठोकपणे प्रसिद्ध केले होते. ३ ते ४ दिवसांपूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार उन्मेष पाटील, खासदार रक्षा खडसे आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिवाळीपूर्वी भरपाई मिळेल, असे जाहीरपणे सांगितले होते.

मात्र शुक्रवारी (ता. १०) रात्री उशिरापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात भरपाईचे रक्कम मिळाली नव्हती. ‘सकाळ’ने सातत्याने याचा पाठपुरावा केला होता. याचा परिणाम म्हणून आज सकाळपासून शेतकऱ्यांना भरपाईचे पैसे बँक खात्यात जमा होण्यास सुरवात झाली आहे.

‘सकाळ’च्या पाठपुराव्यामुळेच ही भरपाई आपल्याला मिळाल्याचे सांगत केळी उत्पादक शेतकऱ्यांनी ‘सकाळ’चे आभार मानले आहेत.

आज दोन बँकांनी भरपाईची रक्कम वाटप केली. सोमवार सायंकाळपर्यंत सर्व ५५ हजार शेतकऱ्यांना भरपाई त्यांच्या बँक खात्यात जमा होईल, अशी माहिती आहे.

Sakal-Impact
Sakal Impact: सारंगखेड्याच्या तापी नदीपुलावरून तब्बल 2 महिन्यांनी धावली बस; ‘सकाळ’च्या पाठपुराव्याची घेतली दखल

''‘सकाळ’ ने नेहमीच केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी रोखठोक भूमिका घेत न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. आताही ‘सकाळ’च्या सातत्याने पाठपुरावा केल्यानेच भरपाईची रक्कम केळी उत्पादकांना मिळाली आहे. त्याबद्दल ‘सकाळ’चे आभार.''- जितेंद्र पाटील, केळी उत्पादक शेतकरी, पाडळा (ता. रावेर जि.जळगाव)

Sakal-Impact
Sakal Impact : न्याहळोद-धुळे रस्त्याच्या कामाला सुरवात; सकाळ वृत्ताची दखल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com