Sakal Impact : सारंगखेडा येथील पुलावरून बसला परवानगी मिळाल्याने विद्यार्थी, पालक व प्रवाशांसह परिसरात समाधान व्यक्त करण्यात होत आहे. सोमवारी (ता. ६) सकाळपासून बस सुरू करण्यात आल्या. तब्बल दोन महिन्यांत बस सुरू झाल्याने विद्यार्थी, पालक व प्रवासी यांनी समाधान व्यक्त केले.
गेल्या दोन महिन्यांपासून पुलाला भागदाड पडल्याने पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. दोन राज्यांना जाणारी वाहतूक वळविण्यात आली होती. (Bus allowed from tapi bridge at Sarangkheda dhule news)
पुलावरून लहान गाड्या, दुचाकी व पादचाऱ्यांना परवानगी देण्यात आली होती. गेल्या दोन महिन्यांपासून कॉलेजला जाणाऱ्या मुलांना पायी प्रवास करत जावे लगेत होते.
मागील महिन्याच्या ऑक्टोबरमध्ये ३० तारखेला लहान व दुचाकी वाहनांना राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी परवानगी दिली होती. मात्र गेल्या मागील महिन्याच्या २४ तारखेपासूनच लहान वाहने व अवजड वाहने सुरू होती. प्रशासनाला माहीत असूनही बेदखल असल्याचा बनाव सुरू होता. बस मात्र कायदेशीर पत्र न दिल्याने बंद होत्या.
याविषयी ‘सकाळ’ने वेळोवेळी प्रवासी, विद्यार्थी व पालक यांच्याविषयी भूमिका मांडली. दिवाळी आल्याने येणाऱ्या-जाणाऱ्या माता-भगिनींचे हाल होत होते. याबाबत ‘सकाळ’ने वेळोवेळी लक्ष वेधले. सुरवातीपासून होणारे नुकसान, विद्यार्थ्यांचे हाल, पालक व प्रवाशांची मनःस्थिती, व्यापारी वर्गाचे नुकसान, राज्य परिवहन महामंडळाला बसणारा फटका याची सतत मांडणी करत पाठपुरावा सुरू होता.
त्याची दखल घेत अधिकाऱ्यांनी तत्काळ महामंडळाला रविवारी (ता. ५) पत्र देत वाहतूक बस सुरू करण्याचे पत्र दिले. शहादा, अक्कलकुवा व दोंडाईचा या आगारांना दर दिवशी एक ते दीड लाखाचा आर्थिक फटका सहन करावा लागला होता. सोमवारी (ता. ६) सकाळपासून बस सुरू करण्यात आल्या. तब्बल दोन महिन्यांत बस सुरू झाल्याने विद्यार्थी, पालक व प्रवासी यांनी समाधान व्यक्त केले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.