BHR Extortion Case : बीएचआर खंडणी प्रकरण फिर्यादी साक्षीदारांचे जाबजबाब सुरूच

BHR Extortion Case
BHR Extortion Caseesakal

जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी प्रकरणी दाखल गुन्ह्यात मदत करण्याच्या नावे उकळण्यात आलेल्या खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्यात फिर्यादी सूरज झंवर याच्यासह इतर साक्षीदारांचे जाबजबाब नोंदविण्याचे काम सुरू असून, त्यातील तथ्य तपासून चौकशीच्या आधारे गुन्ह्याचा तपास करण्यात येत असल्याचे तपास पथकाने सांगितले. (BHR extortion case Testimony of prosecution witnesses continues Shekhar Sonalkar answer recorded today Jalgaon News)

BHR Extortion Case
Jalgaon News : जखमी रेल्वे प्रवाशाच्या मदतीला देवदूत

पुणे डेक्कन पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा तपास जळगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. गुन्ह्याच्या तपासाकरिता जिल्‍हा पोलिस अधीक्षकांनी एसआयटी गठित केली असून, एसआयटी पथकाद्वारे गुन्ह्याचा तपास करण्यात येत आहे.

गुन्ह्याची सुरवात झालेल्या चाळीसगाव शहरातून पथकाने तपासाला सुरवात केली असून, फिर्यादी सूरज झंवरसहित गुन्ह्यातील इतर साक्षीदारांचे जाबजबाब नोंदविण्यात येत आहे. शनिवारी (ता. ४) दिवसभर या गुन्ह्यातील जबाब नोंदवून कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात येत होती.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

BHR Extortion Case
Jalgaon Crime News : अट्टल गुन्हेगाराने घराजवळच केली चोरी; 50 हजारांच्या चोरीत संशयिताला अटक

सोनाळकर यांची आज हजेरी

फॉरेन्सिक लेखापरीक्षक शेखर सोनाळकर यांचा आज जबाब नोंदविण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. एक कोटी २० लाख रुपयांच्या या खंडणी प्रकरणात शेखर सोनाळकर यांना जिल्‍हा न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला असून, तपासाला सहकार्य आणि चौकशीला हजर राहण्याच्या अटीवर त्यांना जामीन मंजूर झाल्याचे सांगण्यात आले.

BHR Extortion Case
Recruitment News : रिक्तपदे भरतीचा मार्ग मोकळा; महासभेत प्रस्ताव मंजूर!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com