Jalgaon News: दिवाळीची साफसफाई बेतली जिवावर; फटाके विक्रेत्याच्या घरात बालमजुराचा शॉक लागून मृत्यू

Child labourers died of shock in firecracker sellers house jalgaon news
Child labourers died of shock in firecracker sellers house jalgaon newsesakal

Jalgaon News : शहरातील बोहरा बाजारातील फटाका विक्रेत्याच्या घराची साफसफाईसाठी पाठवलेल्या बालमजुराचा उघड्या विद्युत तारेवर पाय पडून जागीच मृत्यू झाला. सुनील संजय चव्हाण (वय १६) असे मयताचे नाव आहे.

दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. घर, दुकानात आणि संस्थांमध्ये दिवाळीच्या साफसफाईची कामे सुरू आहेत. काहींनी स्वतः साफसफाईला सुरुवात केलीय, तर काहींनी मजूर लावून घर-दुकानांची साफसफाई सुरू केली आहे. (Child labourers died of shock in firecracker sellers house jalgaon news)

साफसफाई करताना निष्काळजीमुळे एका अल्पवयीन बालकाच्या जिवावर बेतल्याची घटना गणेश कॉलनीत घडली. मूळ मन्यारखेडा-भुसावळ येथील रहिवासी सुनील हा शहरातील बोहरा गल्लीत बांधकामाच्या ठिकाणी आई-वडील व बहीण यांच्या सोबत वास्तव्याला आहे. संपूर्ण कुटुंबीय मोलमजुरी करत असल्याने सुनील हा मिळेल ते काम करून कुटुंबाला हातभार लावत होता.

बोहरा बाजारात राजकमल सिनेमाच्या रांगेत अग्रवाल फॅन्सी फटाके दुकानाचे मालक अनिल अग्रवाल यांनी सुनील आणि त्याचा मित्र सागर सुभाष शिंदे अशा दोघांना त्यांच्या गणेश कॉलनीतील घरी साफसफाई करण्यासाठी पाठवले होते. बुधवारी (ता.१) सकाळी सुनील आणि सागर हे देाघेही अग्रवाल यांच्या घरी साफसफाई करत असताना सुनीलचा पाय खाली पडलेल्या विद्युत तारेवर पडल्या.

Child labourers died of shock in firecracker sellers house jalgaon news
Jalgaon News: भुसावळ विभागाला संपूर्ण कार्यक्षमता शिल्ड प्रदान; रेल्वे व्यवस्थापकांनी स्वीकारला सन्मान

तारेतून पूर्ण क्षमतेने वीजप्रवाह सुरू असल्याने सुनील याला जोरदार विजेचा झटका लागून तो जागेवर कोसळला. त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मयत घोषित केले. सुनीलचे आई-वडील लहान बहिणीला घटनेची माहिती कळताच, ते रुग्णालयात धावत आले. मुलाचा मृत्यू झाल्याचे ऐकताच परिवाराने आक्रोश केला. घटनेची माहिती जिल्‍हा पेठ पेालिसांना दिल्यानंतर त्यांनी रुग्णालयात धाव घेतली.

दोन पैशांची अपेक्षा अन्‌

सुनीलच्या कुटुंबाची बेताची परिस्थिती असल्याने तो कुटुंबाला हातभार लावत होता. दिवाळीचा सण तोंडावर असल्याने काम करून दोन पैसे मिळतील, या अपेक्षेने सुनील व सागर असे दोघे मित्र मिळेल ती कामे करून दिवाळीसाठी पैसे जमा करत असताना अग्रवाल यांच्या घरात दुर्घटना घडून सुनीलचा मृत्यू झाला.

Child labourers died of shock in firecracker sellers house jalgaon news
Jalgaon News: अमळनेर रस्त्यावरील पथदीप ठरताहेत शो-पीस; ‘महावितरण’ परिसरातून वाहनधारकांचे अंधारात मार्गक्रमण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com