Latest Marathi News | मुलींना पदवीपर्यंत मोफत पास द्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur: Pramod Pawar from Chalisgaon raising the issue of free pass for girls before the Assembly Speaker

Jalgaon News : मुलींना पदवीपर्यंत मोफत पास द्या

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) :- ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मोफत त्रैमासिक पास योजना राबविली जाते. या योजनेचा लाभ पदवी स्तरापर्यंत मुलींना देता येईल का?असा महत्त्वाचा प्रश्‍न चाळीसगावचा विद्यार्थी प्रमोद पवार याने विधानसभा अध्यक्षांसमोर प्रश्‍न मांडून सर्वांचेच लक्ष वेधले.

राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेतर्फे नागपूर येथे सुरू असलेल्या विधिमंडळ अधिवेशनात 'संसदीय कार्यप्रणाली आणि प्रथा' या विषयावर ४९ वे संसदीय अभ्यास वर्ग पार पडले. विधिमंडळ सचिवालय विधानभवनात २० ते २७ डिसेंबर हा अभ्यासवर्ग झाला. (Give free pass to girls till graduation Chalisgaon Pramod Pawar raised issue in Commonwealth Parliamentary Board jalgaon news)

हेही वाचा: Nashik News : काट्या मारूती चौकात वाहतूक कोंडी नित्याचीच

त्यात राज्यातील १२ विद्यापीठांचे सुमारे १०० विद्यार्थी उपस्थित होते. सात दिवस विविध विषयांवर मान्यवरांची व्याख्याने झाली. मंगळवारी (ता. २७) अभ्यास वर्गाचा समारोप झाला. समारोपाला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मार्गदर्शन केले.

विधिमंडळाच्या सभागृहात झालेल्या अभ्यास वर्गात बीपी आर्ट्स एसएमए सायन्स आणि केकेसी कॉमर्स कॉलेज चाळीसगावचा विद्यार्थी प्रमोद पवार याने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतर्गत सहभाग घेतला. त्यात प्रमोद पवार याने ग्रामीण भागातील मुलींच्या मोफत पास योजनेबाबतचा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

हेही वाचा: Jalgaon News : विवाहितेने मृत्यूला कवटाळले

पहिली ते बारावीपर्यंत ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मोफत त्रैमासिक पास योजना राबविली जाते. या योजनेचा लाभ पदवी स्तरापर्यंत मुलींना देता येईल का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

नागपूरच्या एका विद्यार्थिनीला गरिबीमुळे शिक्षण घेता आले नाही व पाससाठी पैसे नसल्याने तिने टोकाचा निर्णय घेऊन आत्महत्या केली होती. म्हणून या योजनेला पुढे नेता येईल का ज्यामुळे राज्यातील शिक्षण घेणाऱ्या मुलींचा हा प्रश्न महत्त्वाचा आहे, अशी भावना प्रमोद पवार याने आपल्या प्रश्नातून मांडली.

मंत्रिमंडळाकडे भूमिका मांडणार

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देश प्रबळ सुरक्षित बनविण्यासाठी आपल्या देशात राईट टू एज्युकेशन कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे, असे सांगत शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध व्हायला हव्यात. त्यात कुठे अभाव होत असेल तर निश्चितपणे योग्यरीत्या या भावना मंत्रिमंडळाकडे पोहोचवू व न्याय मिळवून द्यायची भूमिका घेऊ, असे सांगितले. या निवडी संदर्भात प्राचार्य डॉ. मिलिंद बिल्दीकर यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यापीठाकडून संघ व्यवस्थापक म्हणून राज्यशास्त्र विभागाचे प्रा. नितीन नन्नवरे यांची निवड झाली होती.

हेही वाचा: Jalgaon News : बिबट्याचा धुमाकूळ; बंदिस्त कुंपणातून वासरू नेले ओढून