Success Story : Plastic आच्छादनाचा वेगळ्या प्रयोगासह वाढविले उत्पादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Saigaon Farmer Mangesh Mahale farm flourished by covering it with plastic

Success Story : Plastic आच्छादनाचा वेगळ्या प्रयोगासह वाढविले उत्पादन

जळगाव : पारंपरिक शेती न करता अत्याधुनिक पद्धतीने ‘प्लॅस्टिक आच्छादन’ करून शेती करण्याचा अभिनव प्रयोग सायगाव (ता. चाळीसगाव) येथील युवा शेतकरी मंगेश भिवराज महाले याने केला आहे. यामुळे पाणी, वेळ अन्‌ श्रमाची बचत होऊन उत्पादनात वाढ झाल्याचा दावा श्री. महाले यांनी केला आहे.

वडील पारंपरिक शेती करीत होते. मात्र, ती कष्टाची शेती होती. एम.एस्सी. (कीटकशास्त्र) झालेल्या मंगेश याने अत्याधुनिक शेती करण्याचा चंग बांधला. (Increased production separate experiment of plastic mulch Success story of a young farmer of Saigaon Dedicated to modern experimental agriculture Jalgaon)

हेही वाचा: Nashik Accident News : महामार्गावर शहर गुन्हे शाखेच्या वाहनाला अपघात

शिक्षणाची उपयुक्तता शेतीत केली सिद्ध

उच्चशिक्षित असल्याने कमी श्रम, कमी पैसे अन्‌ वेळेची बचत कशा पद्धतीने व्हावी, यासाठी विचारांती दहा एकर जमिनीपैकी पाच ते सहा एकर जमिनीत प्लॅस्टिक आच्छादन केले. यामुळे शेतात तण उगणार नाही. केवळ पीकच उगवेल. यामुळे तण काढणीचा खर्च वाचला. शेतात सध्या वेलवर्गीय पिके ते घेतात. यात काकडी, भेंडी, गिलके, दोडके आदी पिकांचा समावेश आहे. नुकताच रब्बी कांदालागवड सुरू झाली आहे.

हेही वाचा : या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?

हेही वाचा: Jalgaon News : जळगावकरांना मिळणार बाजरीची खिचडी, पोहे अन्‌ पापडही; कृषी विभागाचा उपक्रम

...असा केला प्रयोग

शेतात ठिबक सिंचन करण्यात आले. यामुळे पिकांना त्याच्या गरजेप्रमाणे पाणी दिले जाते. यामुळे पाण्याचा अपव्यय टळला अन्‌ पाण्याची बचतही झाली. पिकांना ऊन, वाऱ्यासह कीटकांचा मोठा सामना करावा लागतो. ते टाळण्यासाठी प्लॅस्टिक आच्छादित शेतीला चारही बाजूंनी कंपाउंड करून घेतले. दहा फूट उंच अशी जाळी लावली. यामुळे दुसऱ्याच्या शेतातील कीड उडून आमच्या शेतात येत नाही. जी कीड त्यांच्या शेतात तयार होते, तिचे निर्मूलन कीटकनाशकाची फवारणी करून ते करतात. यामुळे पिकांचे कीटकांपासून संरक्षण होते.

श्री. मंगेश, त्यांचे आई-वडिलांसह इतर दोन कुटुंब शेतात कामे करतात. नवीन हंगामात १५ ते २० मजुरांकडून कामे करून त्यांना रोजगार दिला जातो. वेलवर्गीय पिकांसोबतच इतर शेतात कापूस, ऊस लावला जातो.

ठिबक सिंचनामुळे पाण्याचा योग्य वापर होतो. जादा पाणी, कमी पाणी पिकांना धोकादायक असते. यामुळे योग्य प्रमाणात पाणी दिले जाते. सीझन असताना चांगला दर मिळतो. सीझन नसला तरी आणि दर कमी झाले तरी उत्पादन खर्च कमी कसा राहील, याकडे कटाक्ष असतो. प्लॅस्टिक आच्छादनाच्या नवीन प्रयोगामुळे उत्पादन वाढले असल्याचे ते सांगतात.

हेही वाचा: Nashik News : अतिरिक्‍त गुणांसाठी प्रस्‍तावाची 23 पर्यंत संधी; मुदतवाढीचा निर्णय