जळगाव : ग. स. च्या सर्वच पॅनलचे उमेदवार ‘फायनल’

सर्वच पॅनलनी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे
  Elecation leadership
Elecation leadershipsakal

जळगाव: जिल्ह्यात महत्त्वाची समजली जाणारी जिल्हा सरकारी नोकरांची पतपेढी (ग.स. सोसायटी)च्या निवडणुकीच्या मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणुकीत चौरंगी,पंचरंगी लढती होण्याची चिन्हे आहेत. सर्वच पॅनलनी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे.आपल्याच पॅनलचे उमेदवार निवडून येण्यासाठी विविध प्रकारच्या यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. सर्व समावेश असे उमेदवार देण्याचा सर्वच पॅनलचा प्रयत्न असल्याचे दिसून येते.

  Elecation leadership
जळगाव : भाजपचे आणखी दोन नगरसेवक शिवसेनेत दाखल

ग. स. सोसायटीच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या जाहीर केल्या आहेत. त्यावर २१ फेब्रुवारीपर्यंत हरकती मागविण्यात आल्या आहे. त्यावर ३ मार्चला सुनावणी होईल. सभासद मतदारांची अंतिम यादी सात मार्चला प्रसिद्ध होईल. ग. स. सोसायटीच्या संचालक मंडळाची मुदत २०२० मध्ये संपली आहे. २१ जागांसाठी होणारी निवडणूक कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे वारंवार पुढे ढकलली होती. आता प्रारूप मतदार याद्या जाहीर झाल्या आहेत.

ग. स. सोसायटीच्या निवडणुकीत सहकार, लोकसहकार, लोकमान्य पॅनल, प्रगती पॅनल, स्वराज्य पॅनल रिंगणात उतरतील. त्या सर्वच पॅनलच्या प्रमुखांनी उमेदवार शोधून ते फायनल केलेले आहे. पॅनल प्रमुख आपल्या संभाव्य उमेदवारांसोबत मेळावे, सभा घेऊन पॅनलची भूमिका समजावून सांगता, उमेदवारांकडे निवडणुकीत लक्ष असू द्या, सांगत आहे.

  Elecation leadership
जप्त मालमत्तांचा लवकरच लिलाव - आयुक्त निंबाळकर

१८ एप्रिलला निवडणूक ?

जिल्हा उपनिबंधक विभागाने प्रारूप मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला. तात्पुरत्या मतदार यादीवर हरकती, आक्षेप मागवण्यात येत आहे. त्यावर सुनावणी होऊन अंतिम मतदार यादी ७ मार्चला जाहीर केली जाईल. त्यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊन ४५ दिवसांत निवडणूक घेण्यात येईल. यात अर्ज दाखल करणे, छाननी, माघार, चिन्ह वाटप, प्रचार, निवडणूक, मतमोजणी असे टप्पे असतील. १८ एप्रिलला मतदान होईल अशी माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली.

  Elecation leadership
Mumbai : थकीत वसुलीसाठी मालमत्तांचा लिलाव?

गट बांधणी सुरू आहे. सहकार गटाचे उमेदवार निश्चित झाले आहेत. पॅनलचा मेळावा नुकताच झाला. त्यात गटाचे श्रेष्ठ, ज्येष्ठ, इच्छुक उमेदवार सर्वच सहभागी होते. निवडणुकीची तारीख जाहीर होण्याची वाट पाहात आहोत.

अभियंता उदय पाटील, सहकार गटप्रमुख

निवडणुकीसाठी सध्या पॅनल प्रमुखांसह सर्वच जण तालुकानिहाय दौरे करीत आहोत. आमच्यासोबत लोकमान्य संस्थापक प्रगती पॅनलचे तीन जण जुळले आहेत. आमच्या पॅनलचे उमेदवार सर्व समावेश असतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com