Jalgaon Rain Electricity supply was interrupted in all parts of city news
Jalgaon Rain Electricity supply was interrupted in all parts of city newssakal

Jalgaon Rain News: अवकाळी पावसाने जळगाव शहर अंधारात! पाऊस सुरु होताच फिडर ट्रीप

Jalgaon Rain News : जळगाव शहरासह परिसरात रविवारी सायंकाळी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. पाऊस सुरू होताच अर्ध्या शहराचा वीजपुरवठा खंडित झाला होता. रात्री ११.३० वाजेनंतर काही भागात वीजपुरवठा बंदच होता. काही भागात रात्रभर वीजपुरवठा सुरु झाला नव्हता. यामुळे नागरिकांना रात्र अंधारातच काढावी लागली.

हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार रविवारी (ता.२६) दिवसभर ढगाळ वातावरण होते. यानंतर सायंकाळी साडेसहा ते सात वाजेच्या सुमारास पावसाळा सुरवात हाळी. दरम्यान रात्री साडेआठनंतर जोरदार पावसाला सुरवात झाली. (Jalgaon Rain Electricity supply was interrupted in all parts of city news)

यानंतर जवळपास शहरातील सर्वच भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता. महावितरणकडून दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले होते. मात्र पाऊस सुरु असल्याने दुरुस्तीच्या कामात अडचणी येत असल्याचे महावितरणचे जळगाव शहराचे कार्यकारी अभियंता चोपडे यांनी ‘सकाळ’ शी बोलताना सांगितले.

पाऊस सुरू होताच फीडर ट्रीप

अवकाळी पावसामुळे अर्ध्या शहरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. रिंगरोड, जुने जळगाव, खोटेनगर, निमखेडी शिवार, शाहूनगर, गणेश कॉलनी, शिव कॉलनी, पिंप्राळा परिसर या भागात वीज पुरवठा रात्री १२ वाजेपर्यंत खंडित होता. यानंतर काही भागातील वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला होता. काही ठिकाणी तांत्रिक दोषामुळे वीजपुरवठा खंडित हाेता. रात्री उशिरापर्यंत वीज दुरुस्तीची कामे सुरू असल्याने रात्रभर वीज खंडितच होती.

Jalgaon Rain Electricity supply was interrupted in all parts of city news
Unmesh Patil : प्रकल्प प्रलंबित ठेवून मलिदा खाणारे जनतेला माहिती : खासदार उन्मेष पाटील

पाणीपुरवठ्यावर परिणाम

खंडित झालेल्या वीज पुरवठ्यामुळे शहरातील बहुतांश भागात होणाऱ्या पाणी पुरवठ्यावरही परिणाम झाला. सोमवारी ज्या भागात पाणीपुरवठा होणार होता, त्यातील काही भागात तो सुरळीत झाला. मात्र, सोमवारीही वीजपुरवठा काही ठिकाणी खंडित राहिल्याने मंगळवार व बुधवारी होणाऱ्या पाणी पुरवठ्यावर त्याचा परिणाम होणार आहे.

रिंगरोड सबस्टेशनच्या दोन लाइनमध्ये बिघाड

महावितरणचे रिंगरोड सबस्टेशनमध्ये येणाऱ्या ३३ केव्हीच्या दोन मेन लाईनमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. यामुळे या सबस्टेशनवरून असलेला संपूर्ण रिंगरोड परिसर, शाहूनगर, गणेश कॉलनी, एलआयसी कॉलनी या भागात रात्रभर अंधार होता.

यातील एका लाइनमध्ये सकाळी दुरुस्ती करण्यात आली होती. दुसऱ्या लाइनमध्ये सायंकाळी ५ वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम सुरु होते. तोपर्यंत या भागात वीज पुरवठा सुरु झालेला नव्हता. तसेच गोलाणी मार्केट परिसरात देखील सकाळी अकरा वाजेपासून वीज गायब होती.

Jalgaon Rain Electricity supply was interrupted in all parts of city news
Tehsildar Protest: तहसीलदार संप झाल्यास शासनाची लाइफ लाईन’ बंद; संघटनेचा आक्रमक पवित्रा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com