Jalgoan : Electric साहित्याचे गोदाम फोडले

Crime News
Crime Newsesakal

जळगाव : शहरातील खंडवा कटपीसमागील दुकानाच्या सिमेंटच्या कडा फोडून दुकानातून एलईडी स्ट्रीट लाईट, जीवन पाईप व केबल असा एकूण १९ हजार ५०० रुपयांचे साहित्य चोरट्यांनी लंपास केले.चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.(Jalgoan Warehouse of electronic material was broken)

जळगाव तालुक्यातील आसोदा येथील सुनील रतनलाल महाजन शासकीय कंत्राटदार आहेत. त्यांचे खंडवा कटपीस दुकानाच्या मागच्या बाजूला इलेक्ट्रिक साहित्य ठेवण्यासाठी गोदाम करण्यात आले असून सोमवारी (ता. १२) त्यांच्या कंपनीत काम करणारा किरण रावसाहेब खलसे हा गोडावूनमध्ये गेला होता. सामान घेतल्यानंतर त्याने गोडाऊन बंद केले व निघून गेला. बुधवारी (ता. १४) दुपारी ३ वाजता गोडाऊनचे मालक भावसार यांनी महाजन यांना फोन करून त्यांच्या गोडाऊनचा दरवाजा उघडा असल्याची माहिती दिली.

Crime News
Jalgaon : भर पावसाळ्यात हंडाभर पाण्यासाठी भटकंती

चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

सुनील महाजन यांनी तत्काळ जाऊन बघितले असता, त्यांना गोडावूनजवळील सिमेंटचा कडा फोडून चोरट्यांनी गोडाऊनमधील केबल, एलईडी लाईट व जीवन ६ फुटाचे पाईप असा एकूण १९ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविलेला आढळला. ही घटना शेजारी असलेल्या दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Crime News
ATM कार्ड बदलून घातला तरुणाला गंडा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com