Jalgaon District Milk Union Election
Jalgaon District Milk Union Electionesakal

Jalgaon Milk Union : दूध संघ निवडणुकीतून चव्हाणांचे उजळले नेतृत्व

भडगाव : जिल्हा दूध संघात माजी मंत्री एकनाथ खडसे यांना मंत्री गिरीश महाजन व गुलाबराव पाटील यांनी धोबीपछाड दिला, हे खरे असले तरी चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी ‘होम पीच’ सोडून मुक्ताईनगरातून लढून श्री. खडसे यांच्यासमोर आव्हान उभे केले.

यामुळे जिल्ह्याचे नेतृत्व म्हणून ते स्वत:ला सिद्ध करण्यात यशस्वी झाले. त्यामुळे आगामी काळात चव्हाणांची जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका राहील, हे निकालानंतर अधोरेखीत झाले आहे. (Mangesh Chavan Bright leadership from Jalgaon Dudh Sangh Election Jalgaon News)

Jalgaon District Milk Union Election
Jalgaon News | कुऱ्हा वढोदा सिंचन योजनेस 2226 कोटींची सुधारित मान्यता : रक्षा खडसे

कधी नव्हे ती जिल्हा दूध संघाची निवडणूक अनेक अर्थाने गाजली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या सहकार पॅनलच्या विरोधात पालकमंत्री गुलाबराव पाटील व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी पॅनलने निवडणूक जिंकली. मात्र चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांचे नेतृत्व जिल्हास्तरावर उजळून निघाले आहे, हे मात्र निश्चित.

चव्हाणांनी दिले खडसेंना आव्हान

जिल्हा दूध संघाची निवडणूक आमदार मंगेश चव्हाण यांच्यामुळे अधिक चर्चेत राहिली. ते दूध संघाचे मुख्य प्रशासक झाल्यापासून त्यांनी एकनाथ खडसेंना आव्हान द्यायला सुरवात केली होती. त्यानंतर निवडणुकीच्या मैदानातही चाळीसगाव हा त्याचा स्वत:चा तालुका सोडून ते मुक्ताईनगर मतदारसंघातून खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्याविरोधात उभे राहिले. निवडणुकीचे काटेकोरपणे नियोजन केले. खडसेंना जशास तसे उत्तरे दिले. एकप्रकारे खडसेंना त्यांनी अंगावर घेतले. नियोजनामुळे ते स्वत: मुक्ताईनगरातून निवडणूक जिंकले. तब्बल १५ जागा त्यांच्या पॅनलच्या निवडून आल्या.

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

Jalgaon District Milk Union Election
Jalgaon News : वावडेत यांत्रिकीकरणातून मजूरटंचाईवर मात

चव्हाणांचे नेतृत्व उजळले

आमदार मंगेश चव्हाण हे चाळीसगावचे आमदार आहेत. मंत्री गिरीश महाजन हे राज्याचे नेतृत्व करतात. त्यामुळे जिल्ह्यात त्यांना वेळ द्यायला मर्यादा येतात. म्हणून जिल्ह्यात गिरीश महाजनानंतर भाजपचे जिल्ह्याचे नेतृत्व म्हणून मंगेश चव्हाण या निवडणुकीच्या निमित्ताने उदयास आले आहे. थेट निवडणुकीच्या माध्यमातून गिरणा पट्ट्याचा नेता तापी पट्ट्यात जाऊन आव्हान देतो, हे सोपे नव्हते. त्यामुळे जिल्ह्यात मंगेश चव्हाणांनी आपला दबदबा निर्माण केला आहे, हे तितकेच खरे आहे. आगामी काळात जिल्ह्याच्या राजकारणात आमदार मंगेश चव्हाण यांची भूमिका निर्णायक राहील, अशी राजकीय क्षेत्रात चर्चा आहे.

मंगेश चव्हाणांची ‘दमदार एंट्री’

आमदार मंगेश चव्हाण यांनी पहिल्यांदाच जिल्हास्तरावरची निवडणूक लढली. त्यामुळे त्यांची पहिलीच एंट्री जोरदार झाली आहे. आगामी काळात दूध संघाची धुरा त्यांच्याच हातात येण्याची चर्चा आहे. ते रविवारी जळगावातून चाळीसगावला येत असताना प्रत्येक गावात त्यांचे ढोल-ताशांच्याच्या निनादात स्वागत करण्यात आले. गिरणा पट्ट्यातून मंगेश चव्हाणांच्या रूपाने नेतृत्व पुढे येते आहे, ही बाब गिरणा पट्टयासाठी सुखावह आहे.

Jalgaon District Milk Union Election
Jalgaon News : पाळीव कुत्रा चावल्याने मालकावर गुन्हा दाखल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com