esakal | पेंटरला विजेचा धक्का लागला..मालकाकडून मृत्यू दडपण्याचा प्रकार
sakal

बोलून बातमी शोधा

Death

पेंटरला विजेचा धक्का लागला..मालकाकडून मृत्यू दडपण्याचा प्रकार

sakal_logo
By
रईस शेख


जळगाव : पांडे चौकात लुंकड टॉवर येथे छतावर काम करताना विजेचा धक्का लागून पेंटरचा जागीच मृत्यू (Death) झाला. खासगी डॉक्टरकडे (Doctor) दाखवून शवविच्छेदन न करताच दुकानमालकाने रिक्षातून मृतदेह घरी पाठवून दिला. कुटुंबीयांनी (Family) विचारपूस केल्यावर त्यांना २ लाख रुपये नुकसान भरपाईचे आमिष दिले. मात्र, दुसऱ्या दिवसापर्यंत मालक आलाच नसल्याने कुटुंबीयांनी प्रेत ताब्यात घेण्यास नकार देत गोंधळ घातला. बाबूलाल बनिमियॉ पटेल (वय ४०, रा. तांबापूरा, जळगाव) असे मयत पेंटरचे नाव आहे.

हेही वाचा: जळगाव जिल्ह्यात आता दररोज १ लाख लसीकरणाचे उद्दिष्ट


नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बाबूलाल पटेल पेंटर काम करून आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करतात. नेहमीप्रमाणे बुधवारी दुपारी ४ वाजता सहकारी सिकंदर तडवीसोबत पांडे चौकातील सुरेंद्र लुंकड यांच्याकडे काम करत होते. दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास रंगकाम करून पत्र्याच्या शेडवरून घाण साफ करण्यास मालकाने सांगितले. त्याच वेळेस वीजतारांना स्पर्श होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. मालक लुंकड यांनी त्यास खासगी रुग्णालयात रवाना केले. डॉक्टरांनी मयत घोषित केल्यावर मृतदेह जिल्हा रुग्णालयात न घेऊन जाता रिक्षाचालकास पन्नास रुपये देत त्याच्या सहकारी कामगारासोबत मृतदेह घरी पाठवून दिला. घडल्या प्रकारचा जाब विचारणा केल्यावर लुंकड यांनी स्वतः हून दोन- अडीच लाखांच्या मदतीची कबुली दिली. मात्र, कुटुंबीयांनी तगादा लावल्यावर जादा रकमेचे आश्वासन दिल्याचे मयताच्या भावाने माहिती देताना सांगितले.

हेही वाचा: केळी वाहतुकीतून रेल्वेला 19 कोटी रुपये उत्पन्न


अखेर मृतदेह जिल्हा रुग्णालयात

मृताच्या नातेवाइकांना भरपाई म्हणून पैसे आणून देतो असे आश्वासन दिल्यानंतर रात्री साडेदहा वाजेनंतरही मालक फोन घेत नसल्याने कुटुंबीयांचा नाईलाज झाला. दुसरीकडे संततधार पाऊस सुरू असल्याने मृतदेह तसाच घरात पडून होता. मदतीचे आश्वासन दिल्यावर मालकच बेपत्ता झाल्याने अखेर बोभाटा होऊन एमआयडीसी पोलिसांत प्रकरण गेले. पोलिसांनी दुसऱ्या दिवशी सकाळीच मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला.

हेही वाचा: अखेर..दीड वर्षांनंतर महाराष्ट्र-मध्यप्रदेशातील बस सेवा पुन्हा सुरूमृतदेह घेण्यास नकार

मृतदेह शवविच्छेदनासाठी आणल्यानंतर मालकाकडून आर्थिक मदत मिळावी, अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा कुटुंबीयांसह हिंदू- मुस्लिम एकता बिल्डिंग पेंटर वेल्फेअर असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष इस्माईल खान, जिल्हा सल्लागार अकील शेख अहमद, दगडू शहा पेंटर आदींनी घेतला. निरीक्षक प्रताप शिकारे यांनी कुटुंबीयांशी चर्चा करून संबंधितांना तक्रार देण्याचे सांगितले. नातेवाइकांनी संध्याकाळी जिल्‍हा पोलिस अधीक्षकांची भेट घेत या बाबत कैफियत मांडली.

loading image
go to top