Gram Panchayat News : ‘आरओ प्लांट’ वरील कोट्यवधीचा खर्च पाण्यात; बहुतांश ग्रामपंचायतींची यंत्रणा नादुरुस्त

RO Plant
News
RO Plant Newsesakal

Jalgaon News : एकीकडे उन्हाळा अधिक तीव्र होत असतानाच घशाला कोरड पडत आहे, तर दुसरीकडे तापमानाचा पारा उंचावल्यामुळे पाणी बॉटल तसेच शीतपेय यांना मागणी वाढली आहे.

अमळनेर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींनी ग्रामस्थांना शुद्ध व थंड पाणी मिळावे, यासाठी लाखो रुपये खर्च करून आरओ प्लांट बसविले आहेत.

मात्र, रणरणत्या उन्हात यातील बहुतांश आरओ प्लांट देखभालीअभावी बंद अवस्थेत असून, धुळखात पडले आहेत. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा निधी पाण्यात गेला आहे. (Most of gram panchayat systems are not working Private water business booming Crores spent on RO plant in water Jalgaon News)

सद्यस्थितीत ‘मे हीट’चा तडाखा चांगलाच बसत आहे. जीवाला गारवा मिळेल, असे थंड अन् शुद्ध पाणी अमळनेर तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतमधील नादुरुस्त असलेले आरओ प्लांटमुळे (ॲक्वा) तेथील ग्रामस्थांना मिळणे अवघड होताना दिसत आहे.

याचे कारण प्रत्येक ग्रामपंचायतीची स्थानिक पातळीवरील उदासीनता दिसून येत आहे. परिणामी, खासगी पाण्याचा व्यवसाय सद्या तेजीत आला आहे. दहा रुपये किमतीचा पाण्याचा जार आता २० ते २५ तर काही ठिकाणी ३० रुपये दराने घ्यावा लागत आहे.

यामुळे सर्वसामान्य जनतेला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. शुद्ध व पुरेसे पाणी मिळणे, हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे, तेव्हा तो प्रत्येकाला मिळालाच पाहिजे. एकीकडे शासनाने ग्राम पातळीवर अमळनेर तालुक्यात लाखो, कोट्यवधी रुपये निधी खर्च करून आरओ प्लांट देऊ केले आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

RO Plant
News
New Parliament Inauguration:सेंगोल समोर मोदींचे दंडवत, संसदेत केली प्रतिष्ठापना

मात्र याची पाहिजे तशी पूर्तता होताना दिसत नाही. आजच्या स्थितीत संपूर्ण तालुक्यातील गावांचा सर्वे केला तर दहा, वीस टक्केच ग्रामपंचायतीत अक्वा आरओ प्लांट नसतील; आज जवळपास जलजीवन मिशन अंतर्गत शासनाने राहिलेल्या ठिकाणी आरओ प्लांटसह पाणीपुरवठा योजना देऊ केल्या आहेत.

परंतु याची ठोस अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. अमळनेर तालुक्यात बहुतेक ठिकाणी हे प्लांट तर आहेत; परंतु कुठे सुरू, कुठे बंद तर कुठे सुरू होण्यापूर्वीच नादुरुस्त तर काही ठिकाणी सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर सुरू असलेल्या आरओ प्लांटचे आज व्यवसायिकीकरण होताना दिसून येत आहे. यामुळे साहजिकच खासगी पाण्याचा व्यवसाय तेजीत येऊन सर्वसामान्य जनतेला आर्थिक संकटांस तोंड द्यावे लागत आहे.

RO Plant
News
Jalgaon Accident News : सुसाट ट्रकच्या धडकेत पतीचा मृत्यू ,पत्नी गंभीर

...या ग्रामपंचायतींचे ‘आरओ’ ठरताय ‘शोपीस’

अमळनेर तालुक्यातील बहुतांश ठिकाणी बंद व नादुरुस्त असलेले ग्रामपंचायतचे ‘आरओ प्लांट’ पुढील प्रमाणे : भोरटेक (सुरू होण्याचा प्रतीक्षेत), धार (शून्य), मारवड (गेल्या चार, पाच दिवसांपासून बंद), गोवर्धन (पाण्याच्या दुर्भिक्षामुळे काही दिवसांपासून बंद), डांगरी (काही दिवस सुरू होते.

मात्र आजतागायत बंदच), कळमसरे (नादुरुस्त- या ठिकाणी महिन्यातून दोन ते तीन वेळा तांत्रिक अडचणीमुळे बंदच आढळून येतो), वासरे (या ठिकाणी वासरे, खेडी, खरदे अशी तीन गावे मिळून ग्रुप ग्रामपंचायत आहे.

या गावात काही महिन्यांपूर्वीच आरओ फिल्टर्स प्लांट मिळालेला आहे; परंतु हा देखील आजच्या घडीला नादुरुस्त च्या असून, अखेरच्या घटका मोजत आहे.) नीम - या ठिकाणी तर हद्दच. माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या कार्यकाळात दिला गेलेला फिल्टर प्लांट सुरुवातीचे दोन वर्षे त्यांच्याच कार्यकर्त्यास कंत्राटी पद्धतीने दिले गेल्याची चर्चा आहे.

एवढेच नाही तर त्याने नादुरुस्त होताच ग्रामपंचायतीच्या स्वाधीन करून पळ काढल्याचे बोलले जातेय. त्यामुळे आजच्या स्थितीत येथील फिल्टर प्लांट देखील नादुरुस्तच आहे.

RO Plant
News
Drainage Cleaning News : शहरात 2 दिवसांत सुरू होणार नाले सफाई

अधिकारी लक्ष देतील काय?

पंचायत समिती अंतर्गत तालुक्यात ज्या ठिकाणी आरओ प्लान्ट दिले आहेत, त्या ठिकाणी गटविकास अधिकारी यंत्रणेची काय परिस्थिती आहे, याचा पाठपुरावा करतील काय? शासनाने ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध व थंड पाणी मिळावे, यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केला आहे. जबाबदार अधिकाऱ्यांनी झोपेचे सोंग घेऊ नये, अशीही चर्चा होत आहे.

RO Plant
News
New Sansad Bhavan : सेंगोल राजदंडाचे हे वैशिष्ट्य माहितीयेत?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com