National Nutrition Month : कुपोषण मुक्तीसाठी सप्टेंबर राष्ट्रीय पोषण महिना; सर्व शासकीय यंत्रणेला केंद्राचे आदेश

malnutrition
malnutrition

National Nutrition Month : जिल्ह्यात कुपोषणग्रस्त बालकांची संख्या वाढल्याने केंद्र शासनाने सर्व शासकीय यंत्रणांनी एकत्रीत येवून सप्टेंबर हा राष्ट्रीय पोषण महिना म्हणून पाळण्याचे आदेश केंद्र शासनाने दिले आहेत.

यात अंगणवाडी सेवकांसह सर्व शासकीय विभागांना सोबत घेवून जिल्हा कुपोषण मुक्त कसा होईल, यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश आहेत. रोज गृहभेटीद्वारे कुपोषीत बालकांचे निरीक्षण केले जाणार आहे. (Orders to observe September as National Nutrition Month for eradication of malnutrition jalgaon news)

जिल्हा शल्य चिकीत्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद महिला आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, बाल विकास अधिकारी, महापालिकेसह सुमारे ४५ शासकीय विभागांना हे उपक्रम राबविण्याचे आदेश आहेत. कुपोषण मुक्त भारत संकल्पनेच्या यशस्वीतेसाठी शासनाच्या विविध विभागांमध्ये अभिसरण पद्धतीने पोषण अभियान कार्यक्रम जळगाव जिल्ह्यात राबविण्याचे आदेश आहेत. १ ते ३० सप्टेंबरपर्यंत महिनाभर ही संकल्पना राबविली जाईल. ‘सुपोषित भारत, साक्षर भारत, सशक्त भारत’ ही मध्यवर्ती संकल्पना असेल.

यात प्रामुख्याने अनिमिया तपासणी, उपाय व जागृती चाचणी, पोषणाबरोबर शिक्षण, बाळाच्या जन्मानंतर सहा महिन्यांपर्यंत केवळ स्तनपान, नंतर पुरक पोषण आहार, स्वस्थ बालक स्पर्धा, पोषण विषयक सुधारणा, आदीवासी भागात पोषण विषयक संवेदनशीलता वाढविणे, हे उपक्रम रोज राबविले जाणार आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

malnutrition
Jalgaon News: HIV बधितांचे पुनर्वसन प्रशासन करणार : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

कृती आराखडा तयार

पोषण अभियानाअंतर्गत सप्टेंबर महिन्यात दर दिवशी कोणता विभाग, कोणती यंत्रणा जिल्हा, प्रकल्प गाव, शहर, अंगणवाडी, महाविद्यालयाच्या ठिकाणी उपक्रम राबवेल याचा प्लॅन (कृती आराखडा) तयार करण्यात आला आहे. त्यात अंगणवाडी सेविका, आरोग्य यंत्रणा, शिक्षण विभाग, पाणी पुरवठा विभाग, ग्रामपंचायत विभाग आदींना सोबत घेवून जनजागृती व मार्गदर्शन केले जाणार आहे.

गृहभेटी देवून बाळाबाबत काळजी घेतली जात आहे किंवा नाही याची दक्षता घेतली जाईल. स्वस्थ बालक स्पर्धा घेवून पालकांना बाळाची काळजी कशी घ्यावी, याबाबत माहिती दिली जाईल.

बाळाला दूध पुरसे मिळते आहे का, बालक कुपोषीत आहे का याबाबत गृहभेटीद्वारे त्यांच्यावर नजर ठेवली जाइल. बालकांना पोषक व येाग्य आहार देण्याबाबत पालकांना मार्गदर्शन केले जाईल.

malnutrition
Rohit Pawar: फडणवीस ‘एसी’त बसून बोलू नका, परिस्थिती पाहा, राजीनामा द्या : आमदार रोहित पवार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com