SAKAL Exclusive : परीक्षा काळात नैराश्याचे वाढते प्रमाण; पालक आणि मुलांमध्ये सुसंवादाची गरज

अभ्यासाच्या ताण- तणावामुळे विद्यार्थ्यांमधील नैराश्याची भावना वाढीस लागत आहे.
stress of study
stress of studyesakal

SAKAL Exclusive : शाळा-महाविद्यालयीन मुलांच्या परीक्षांचा सध्याचा काळ आहे. परीक्षा मुलांची असली, तरी त्यासाठी पालकांसाठी देखील कसोटी ठरत आहे. अभ्यासाच्या ताण- तणावामुळे विद्यार्थ्यांमधील नैराश्याची भावना वाढीस लागत आहे.

त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांशी सतत संवाद साधणे गरजेचे झाले आहे. (sakal Exclusive stress of studying is increasing feelings of depression among students jalgaon news)

पालक आणि विद्यार्थ्यांसाठी परीक्षे दरम्यान तणाव चिंताजनक काळ ठरतो. परीक्षेच्या ताणामुळे पालक, शिक्षक आणि कुटुंबातील सदस्यांकडून शैक्षणिक अपेक्षा, खूप जास्त गुणांची अपेक्षा वाढतच चालली आहे. सध्याची परीक्षा प्रणालीच्या दबावामुळे अप्रिय मानसिक परिस्थिती विद्यार्थ्यांत निर्माण होत आहे.

परीक्षेच्या दबावामुळे परीक्षेचा ताण व चिंतेत वाढ होऊन ज्याचा विद्यार्थ्यांवर परीक्षेपूर्वी आणि नंतर परिणाम होतो हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. विद्यार्थ्यांच्या जीवनात तणावाची विविध कारणे असून, खूप असाईनमेंट, इतर विद्यार्थ्यांशी मार्क्स बद्दलची स्पर्धा, अपयश, वाईट सवयी, सतत अभ्यासाचा आणि कोचिंग अत्याधिक दबावाचा परिणाम परीक्षेच्या काळात विद्यार्थी वर होतो.

परीक्षेच्या ताण-तणावाखाली अल्पवयीन मुला-मुलींच्या वाढत्या आत्महत्या ही एक मुख्य समस्या झाली आहे. त्यामुळे मुले-मुली कोणतीही कारणामुळे नैराश्यात जातात आणि जीवन संपविण्याचा विचार करतात. यासाठी आता पालकांनी मुलांशी सतत संवाद साधणे गरजेचे बनले आहे. मुलांकडून पालकांच्या अवास्तव अपेक्षा, इतर मुलांशी तुलना करणे आदी कारणामुळे मुले नैराश्यात जात असल्याचे दिसून येते.

stress of study
SAKAL Exclusive: किती गुरुजींनी फोटो वर्गात लावले याचा मागवला अहवाल! वादाला पुन्हा तोंड फुटण्याची शक्यता

विद्यार्थी जीवनात तणावाची लक्षणे

* मोबाईल, टीव्हीमध्ये व्यस्त असून, समाजाचे भान विसरणे, अति जागरण करणे.

* आत्मविश्वास कमी होऊन भीती अनुभव करणे.

* अति राग, चिडचिड स्वभाव, भोजनास महत्त्व न देणे, आत्महत्येसारखे टोकाचे विचार सतत येणे. यासह इतर कारणांमुळे विद्यार्थी नैराश्य ग्रस्त असल्याचे दिसून येते.

तणाव कमी करण्यासाठी उपाय

* जीवनात हसण्याची प्रवृत्ती वाढविणे.

* पालकांनी आपल्या मुलांसोबत सुसंवाद साधावा.

* घरातील वातावरण सकारात्मक ठेवावे.

* मुलांची रुची ओळखून त्यांना त्या गोष्टी करण्यासाठी प्रोत्साहन करावे.

stress of study
Sakal Exclusive: वीजपुरवठा गावाचा करू नका खंडित; शेतकऱ्यांच्या रोषामुळे प्रशासनाचे दोन पावले मागे

''आनंदी मन, शरीर, चांगले पोषण आणि विश्रांती यासाठी अनुकूल वेळापत्रक तयार करा. मुलाला परीक्षा काळातून जाण्यासाठी त्याला क्षमतेची जाणीव करून द्या. नाडी शोधन प्राणायामाचा सराव करावा. तुमच्या मुलाला अभ्यासक्रमात काही अडचण असल्यास मदत करा.'' -अभिजीत अहिरे, आयुर्वेद तज्ज्ञ.

''विद्यार्थ्यांनी परीक्षेला जाताना मी केलेला अभ्यास हा माझ्या पूर्ण लक्षात आहे. सकारात्मक हेतू ठेवून परीक्षा जावे. मी केलेला अभ्यास हा माझ्या परीक्षेत खूप चांगल्या पद्धतीने मला त्याचा उपयोग होणार आहे आणि मला कुठल्या प्रकारचा जरी पेपर झाला. तर मला कुठल्याही प्रकारची भीती नाही आहे तो ठेवून परीक्षेला सामोरे जा. पालकांनीही विद्यार्थ्यांवर अमुकचे टक्के पडले पाहिजे असे अपेक्षा नको ठेवायला.''-मानसतज्ञ दौलत निमसे (पाटील) सिव्हील हॉस्पिटल, जळगाव

stress of study
SAKAL Exclusive: केंद्रप्रमुखांसह बहुतांश पदभार ‘गुरूजीं’कडेच; शिक्षक भरतीअभावी ताण वाढला!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com