Akshaya Tritiya 2023 : स्वामिनारायण मंदिरात अखाजीनिमित्त 821 घागरींचे पूजन

Puja of 821 pot performed on the occasion of Akshaya Tritiya in Swami Narayan Temple.
Puja of 821 pot performed on the occasion of Akshaya Tritiya in Swami Narayan Temple.esakal

Jalgaon News : येथील टी. व्ही टॉवरशेजारील नवनिर्माण स्वामिनारायण मंदिरात शनिवारी (ता. २२) अक्षय तृतीयेनिमित्त घागरभरण आणि तर्पण विधी दहा ब्राह्मणांच्या मुखातून शास्त्रोक्त पद्धतीने मंत्रोच्चाराच्या गजरात झाला. (Worship of 821 pot on occasion of Akshaya in Swaminarayan temple jalgaon news)

अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त समजला जातो. या दिवशी सतयुग, त्रेतायुग, कलीयुगाची सुरवात झाली. या दिवशी भगवान परशुराम यांचा जन्मदिवस आहे. अशा पवित्र दिवशी आपल्या पितरांना, वाडवडिलांना उद्देशून तर्पण कर्म करण्याची परंपरा घराघरात चालत आलेली आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Puja of 821 pot performed on the occasion of Akshaya Tritiya in Swami Narayan Temple.
Akshaya Tritiya : सोने ‘दरवाढी’चा विक्रीवर परिणाम; घरे बुकींगला प्रतिसाद

घरात मातीची घागर आणून त्यावर डांगर, फळ, नारळ, फुले ठेवून त्याची पूजा केली जाते. आग्यारी करून गोड-धोड, वडे-भजे, आमरस, पुरणपोळीचा घास भरविण्याची प्राचीन प्रथा आहे. यानिमित्त जळगाव येथील स्वामिनारायण मंदिरात घागर भरण व पितृ तर्पण कार्यक्रम वेदोक्त मंत्रोच्चारात ब्राह्मणांमार्फत झाला.

यात जळगाव येथील ८२१ हरीभक्तांनी नाव नोंदणी केली. तेवढ्याच घागरी आणून सर्व विधी झाला. यात गुरुवर्य गोविंद प्रसाददास स्वामी यांचे आर्शिवाद, शास्त्री पुरुषोत्तम प्रकाशदास यांचे मार्गदर्शन, शास्त्री नयनप्रकाश यांनी संयोजन केले.

Puja of 821 pot performed on the occasion of Akshaya Tritiya in Swami Narayan Temple.
Akshaya Tritiya 2023 : अक्षयतृतीयेच्या मुहूर्ताला सोनेविक्रीत 30 टक्के घट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com