दापोलीतील नागरिक मंडणगडात क्कारंन्टाईन मुंबईतून ७७ नागरिक आले चालत...

70 people in Mumbai are Quarantine for Mandangad  kokan marathi news
70 people in Mumbai are Quarantine for Mandangad kokan marathi news

मंडणगड (रत्नागिरी) : मुंबई, नालासोपारा येथून दोनशे किमी चालत येणाऱ्या नागरिकांना मंडणगड तालुक्यातील म्हाप्रळ चेक पोस्टवर ताब्यात घेण्यात येत असून त्यांचे चवदा दिवसांसाठी विलगिकरण करण्यात येत आहे. यात दापोलीतील ३३ व मंडणगडच्या ४४ नागरिकांचा समावेश आहे. म्हाप्रळ व मंडणगड येथील केंद्रात एकूण ७७ नागरिकांना विलगिकरण करून सुरक्षित ठेवण्यात आले आहे.

 मुंबई, पुणे येथील येथील प्रवाश्यांना रत्नागिरी जिल्ह्यात येण्यासाठी मंडणगड आणि खेड तालुका हे प्रवेशद्वार आहेत. कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबईस्तीत नागरिकांचा मिळेल त्या मार्गाने आपल्या गावी येण्याचा कल मागील तीन दिवसांपासून वाढला आहे. मंगळवार, बुधवार या दोन दिवसात ५४ नागरिक पाई चालत तालुक्यात दाखल झाले. तर शुक्रवारी ( ता.३ ) रोजी पहाटे १७ नागरिकांची भर पडली आहे. यामध्ये दापोली येथील नागरिकांचा समावेश आहे.

मुंबईतून ७७ नागरिक आले चालत​

कोरोनाच्या भीतीने गावाकडे येणाऱ्यांचा कल वाढतच आहे. तीन दिवसामध्ये तालुक्यात ७७ चाकरमानी दाखल झाले आहेत. गुरूवारी सायंकाळी म्हाप्रळ येथे अन्य १७ नागरीक दाखल झाले असून त्यांना म्हाप्रळ येथील जि.प. शाळेत विलगीकारण करून ठेवण्यात आले आहे. काल विलगीकरण करण्यात आलेल्या नागरीकांच्या संख्येनंतर म्हाप्रळ येथील विलगीकरण केंद्राची मर्यादा संपली असून यानंतर येणाऱ्या नागरीकांना तालुक्यातील अन्य ठिकाणी ठेवावे लागणार आहे.

दापोलीतील नागरिक मंडणगडात कोरोन्टाईन​

याचबरोबर तालुक्यातील पणदेरी परिसरातील अन्य 6 नागरीक वाढल्यामुळे त्यांना शुक्रवारी सायंकाळी उशिरा वैद्यकिय तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना लोकनेते गोपीनाथजी मुंडे महाविद्यालय विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले आहे. दरम्यान दोन दिवसांपासून शहरातील जि.प. नुतन विद्यामंदीर याठीकाणी ठेवण्यात आलेल्या २१ जणांसदर्भात शहरातील नागरीकांनी हरकती घेतल्याने त्यांना शहरापासून दूर असलेल्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे महाविद्यालयात हलवण्यात आले आहे.

एकुण तालुक्यात ७७ चाकरमान्यांना दोन विलगीकरण केंद्रामध्ये विलगीकरण करून ठेवण्यात आले आहे. म्हाप्रळ येथ आलेल्या १७ जण हे दापोली तालुक्यातील नागरीक आहेत. तर सायंकाळी आलेले 6 नागरीक हे पणदेरी परीसरातील आहेत. हे नागरीक छुप्या मार्गने येवून आपल्या गावात गेले होते. याची माहिती मिळाल्यावर प्रशासनाने त्यांची वैद्यकिय तपासणी करून विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे सारेच ठप्प असल्याने मुंबईतील तालुक्यातील  चाकरमानी यांचे येण्याचे प्रमाण हे वाढतच आहे.

संख्या वाढती, प्रशासकीय यंत्रणेवर ताण

दरम्यान या पार्श्वभूमीवर मंडणगडचे पोलीस निरीक्षक सुदाम शिंदे यांनी या सीमांवर कडक बंदोबस्त ठेवला आहे. आलेल्या सर्व नागरिकांना ताब्यात घेऊन म्हाप्रळ येथे जि.प. शाळा व मंडणगड शहरातील नुतन विद्यामंदिरात विलगीकरण कक्षात निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकडाऊन करण्यात आले असून जिल्ह्याच्या सर्वच सीमा बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे मुंबईहून गावी जाण्याचे परतीचे सारे दोर कापण्यात आल्याने गावात येण्याची चिंता चाकरमान्यांना सतावत आहे. प्रशासनाकडून नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना केल्या जात असतानाही त्याकडे कानाडोळा करत गाव गाठण्यासाठी काही चाकरमानी नवनव्या युक्त्यांचा अवलंब करत आहेत.

काहीजण पोलिसांना चकवा देत गाव गाठण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र पोलिसांच्या नाकाबंदीत त्यांना कारवाईला सामोरे जावे लागत आहे. निवारा व कामधंदा नसल्याने उपासमार होत असून याचमुळे पायी प्रवास करत गावी निघाली असल्याची माहीती पुढे आली आहे.  या सर्वांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून १४ दिवस विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेवरचा ताण अधिकच वाढला
कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी आरेाग्य यंत्रणा मागील वीस दिवसांपासून दिवसरात्र काम करत असतानाच आता या यंत्रणेवरील ताण अधिक वाढला आहे. तालुक्यात हजारो नागरीकांच्या आरोग्य सेवेसाठी केवळ ५५ कर्मचारी अशी अपूरी व्यवस्था असताना त्यातच आता तालुक्यात कामासाठी आलेल्या मजुरांचे वैद्यकीय अहवाल पाठवण्याची जबाबदारी वाढल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांवर अधिकचा भार पडत आहे. त्यातच तालुक्यात दोन ठिकाणी तपासणी नाके असल्याने कर्मचारी सतत ठेवावे लागत आहेत. यामुळे आता आरोग्य विभागाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.
-

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com