Anant Gite I रत्नागिरीत सामंतांची रणनीती भेदण्याचं आव्हान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

anant gite and uday samant political news in konkan

२०१४ ला सामंतांनी राष्ट्रवादीला रामराम करुन शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला अन् मतदारसंघावर एकछत्री अंमल निर्माण केलाय

रत्नागिरीत सामंतांची रणनीती भेदण्याचं आव्हान

रत्नागिरी : रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून भविष्यात विधानसभेला शिवसेनेकडून उदय बनेंच असतील असे माजी खासदार नेते अनंत गितेंनी जाहीर केले; मात्र २००४ पासून २०१९ पर्यंतच्या निवडणुकीत विद्यमान आमदार उदय सामंत यांनी स्वतःचे प्रस्थ निर्माण केले आहे. बनेंचा तळागाळात थेट संपर्क असला तरीही सामंतांची निवडणुकीत उतरण्याची रणनिती भेदणे बनेंसाठी मोठे आव्हानात्मक ठरु शकते. (anant gite and uday samant political news in konkan)

शिवसेना-भाजप युतीचा मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणार्‍या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात २००४ साली राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेतृत्व उदय सामंत यांनी आमदार म्हणून वर्चस्व प्रस्थापित केले. त्यानंतर २०१९ पर्यंतच्या सर्वच निवडणुकांमध्ये ते आमदार म्हणून कार्यरत आहेत. २०१४ ला त्यांनी राष्ट्रवादीला रामराम करुन शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला. मागील साडेआठ वर्षात त्यांनी मतदारसंघावर एकछत्री अंमल निर्माण केला आहे.

मतदारसंघात नेतृत्त्वाची दुसरी फळी निर्माण होणार नाही, याची काळजी तेवढीच घेतली आहे. दोनवेळा मंत्री पद भुषवलेले असल्यामुळे रत्नागिरीत सामंतांचा लोकसंपर्क वाढलेला आहे. या परिस्थितीत शिवसेनेचे माजी खासदार अनंत गितेंनी सामंतांच्या विरोधात उदय बनेंचे नाव जाहीर केल्याने मतदारसंघात तर्कवितर्कांना सुरवात झाली आहे. बने यांची कारकीर्द रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात तेवढीच ताकदीची राहीली आहे. पाच विविध जिल्हा परिषद गटांमधून निवडून आलेले ते एकमेव शिवसैनिक आहेत.

हेही वाचा: Sharad Ponkshe : पोंक्षेंना थेट आव्हान; 'या जाहीर चर्चेला, कधीही अन् कुठंही...'

काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष राजाभाऊ लिमयेंसारख्या तगड्या उमेदवाराचा पराभव करून पावस जिल्हा परिषद गटातून ते विजयी झाले होते. त्यानंतर आतापर्यंत जिल्हा परिषदेवर ते निवडून गेले आहेत. तालुकाप्रमुख, जिल्हाप्रमुख अशी पदेही त्यांनी शिवसेनेत भूषवली. विधानसभेसाठी दरवेळी त्यांच्या नावाची फक्त चर्चाच राहायची. २०१४ ला उदय बनेंच्या नावाची चर्चा होती. माजी मंत्री अनंत गीते हे बनेंचे मार्गदर्शक म्हणून ओळखले जातात. पण त्यांची ताकदही बनेंना विधानसभा मिळवून देऊ शकली नव्हती.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर निर्माण झालेल्या राजकीय गोंधळात अनंत गितेंसारख्या शिवसैनिकांनी पुन्हा उचल खाल्ली आहे. शिवसेनेतील दुसऱ्या क्रमांकाची फळी अ‍ॅक्टीव्ह करण्यावर त्यांचा भर दिसत आहे. रत्नागिरीसारख्या ठिकाणी थेट लोकसंपर्क असलेल्या उदय बनेंना विधानसभेला उतरवण्याची तयारी गितेंनी केली आहे. बनेंच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कृतज्ञता सोहळ्यात गितेंनी विधानसभेचे उमेदवार असतील असे जाहीर करुन टाकले.

हेही वाचा: Shivsena V/S BJP : दिल्लीत शिंदेंऐवजी फडणवीस; नक्की मुख्यमंत्री कोण? ठाकरेंच्या सेनेचा सवाल

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील एकूण बलाबलाच्या चर्चेला तोंड फुटले आहे. रत्नागिरी हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला असला तरीही उदय सामंतांनी तळागाळात तयार केलेली कार्यकर्त्यांची फळी ही त्यांची नेहमीच उजवी बाजू ठरली आहे. निवडणुकीतील विजयाचे सुत्र गेल्या पाच टर्मममध्ये त्यांनी आत्मसात केले आहे. ही अभेद्य रणनीती फोडणे हे उदय बनेंपुढे आव्हानात्मकच आहे. तळागाळातील शिवसैनिकांच्या जोरावरच ही लढाई बनेंना लढावी लागणार असल्याचे दिसत आहे.

"रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून भविष्यात बनेंचा उदय होईल. त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे करतील."

- अनंत गीते, माजी खासदार

हेही वाचा: जवाब दो! खासदार धैर्यशील मानेंच्या घरावर शिवसैनिकांचा मोर्चा, मोठा पोलिस बंदोबस्त तैनात

"राजकारणात पदे येत-जात असतात. त्यापेक्षा भविष्यातील प्रत्येक क्षण शिवसेनेसाठी जगणार आहे. त्यासाठी माझी सर्वप्रकारे तयारी आहे."

- उदय बने, माजी जिल्हाप्रमुख

Web Title: Anant Gite Says Uday Samant Political Leadership Strong Challenge To Uday Bane In Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..