Sawantwadi Station : मांडवी एक्स्प्रेसच्या शेवटच्या डब्याला लागली आग? प्रवाशांची पळापळ, चाकांतून धूर आल्याने भीतीचे सावट

रेल्वेच्या (Railway) चाकामधील ''ब्रेक बाईडिंग''मुळे (Brake Binding) धूर आल्याचे समोर आले.
Sawantwadi Station
Sawantwadi Stationesakal
Summary

अचानक झालेल्या घटनेमुळे प्रवाशांच्या काळजाचा ठोका मात्र चुकला.

सावंतवाडी : गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मांडवी एक्स्प्रेसच्या शेवटच्या डब्याखालून धूर आल्याने आग लागल्याच्या समजातून प्रवाशांची एकच तारांबळ उडाली. ही घटना मडुरा व सावंतवाडी स्थाकनादरम्यान घडली. याबाबतची माहिती गार्डला मिळताच एक्स्प्रेस सावंतवाडी स्थानकात (Sawantwadi Station) थांबवून पाहणी करण्यात आली.

त्यावेळी रेल्वेच्या (Railway) चाकामधील ''ब्रेक बाईडिंग''मुळे (Brake Binding) धूर आल्याचे समोर आले. त्यानंतर अग्निरोधक साहित्याद्वारे धुरावर नियंत्रण मिळविण्यात आले. ही घटना सकाळी सव्वाअकराच्या सुमारास झाली. मडगाव टर्मिनसवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या मांडवी एक्स्प्रेस नेहमीप्रमाणे सकाळी दहाच्या सुमारास मडगावातून निघाली. ती मडुरा स्थानकातून मार्गस्थ झाल्यानंतर काही अंतरावर गार्डच्या डब्याखालून धूर येत असल्याचे निदर्शनास आले.

Sawantwadi Station
Ratnagiri Politics : 'मयेकर आमचे सर्वांचेच मामा, ते भाजपवर नाराज नाहीत'; मंत्री चव्हाणांच्या दाव्याने चर्चांना उधाण

काही प्रवाशांनी ते पाहताच गाडीला आग लागली असल्याचा समज करून आरडाओरड सुरू केली. रेल्वे गार्डच्याही ही घटना निदर्शनास आली. त्यांनी त्वरित सावंतवाडी स्थानकात संपर्क साधून याची माहिती दिली. तोपर्यंत गाडी सावंतवाडी स्थानकात दाखल झाली. या वेळी शेवटच्या गार्डच्या डब्यालगत असलेल्या महिला आरक्षित डब्यातील महिला प्रवाशांनी उतरुन प्लॅटफॉर्मवर धाव घेतली. काय झाले, हे कोणालाच कळले नव्हते. त्यामुळे या प्रवाशांमध्ये भितीचे सावट होते.

Sawantwadi Station
Ratnagiri : पोचरीच्या सुपुत्राचा NASA मध्ये डंका; ओंकार धामणेनं केलं संधीचं सोनं, शोधनिबंध आंतरराष्ट्रीय परिषदेत सादर

रेल्वे कर्मचाऱ्यांनी पाहणी केली असता हा ‘ब्रेक बाईडिंग’चा प्रकार असल्याचे निदर्शनास आले. या वेळी त्यांनी ब्रेकमधील तांत्रिक दोष असून घाबरून जाण्याचे कारण नाही, असे सांगून प्रवाशांना धीर दिला. अग्निरोधक कीटच्या सहाय्याने धुरावर नियंत्रण मिळविले. यानंतर तांत्रिक दोष दूर करून गाडी त्वरित पुढील प्रवासासाठी मार्गस्थ करण्यात आली. अचानक झालेल्या घटनेमुळे प्रवाशांच्या काळजाचा ठोका मात्र चुकला. ब्रेकमधील तांत्रिक दोषामुळे ही घटना घडल्याची माहिती कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी दिली.

Sawantwadi Station
Karnataka Politics : काँग्रेस हायकमांडनं 'हा' विषय घेतला गांभीर्यानं, सुरजेवालांनी थेट आमदार, मंत्र्यांनाच धरलं धारेवर

ब्रेक बाईडिंग म्हणजे काय?

रेल्वेमधील ब्रेक यंत्रणा ‘डिस्क ब्रेक’ प्रमाणे कार्य करते. ती चाकाच्या ठिकाणी बसविलेली असते. कधीकधी ब्रेक केल्यानंतर तो भाग सुटत नाही. तो तसाच चिटकून राहतो व उष्णतेमुळे त्यातून धुरासारखी घटना घडते. याला ‘ब्रेक बाईडिंग’ असे म्हणतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com