'भाजप हा परिवार असून आपल्या पाठीशी नरेंद्र मोदी, अमित शाहांसह बावनकुळे, फडणवीस, राणे आहेत' - चित्रा वाघ

भाजप (BJP) पक्ष हा परिवार आहे. या परिवारात प्रत्येकाचा सन्मान केला जातो.
BJP Chitra Wagh
BJP Chitra Waghesakal
Summary

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) महिला आघाडी जिल्हाध्यक्षा व प्रदेश सरचिटणीस चित्रा चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

चिपळूण : भाजप (BJP) पक्ष हा परिवार आहे. या परिवारात प्रत्येकाचा सन्मान केला जातो. हा शब्द भाजपमध्ये प्रवेश केलेल्या चित्रा चव्हाण यांच्यासह अन्य महिला पदाधिकाऱ्यांना आपण दिला आहे. तुम्ही सर्व भाजप नेतृत्वावर विश्वास ठेवून आला आहात. तुम्हा सर्व महिलांना सन्मान देऊ, असा विश्वास भाजप प्रदेश महिला मोर्चा अध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी चिपळूणमध्ये नारी शक्ती वंदन मेळाव्यात व्यक्त केला.

BJP Chitra Wagh
धैर्यशील मानेंचा पत्ता कट? हातकणंगलेतून कोरेंसाठी चाचपणी; फडणवीसांसोबतच्या चर्चेनंतर जोरदार हालचाली

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) महिला आघाडी जिल्हाध्यक्षा व प्रदेश सरचिटणीस चित्रा चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांची महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा व रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या संयोजिकापदी निवडीची घोषणा केली. हा कार्यक्रम चितळे मंगल कार्यालयात झाला.

प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांचे चिपळूणमध्ये आगमन होताच उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षा व माजी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांनी महिला पदाधिकाऱ्यांसमवेत जोरदार स्वागत केले. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडी माजी जिल्हाध्यक्ष चित्रा चव्हाण, काँग्रेसच्या श्रद्धा कदम, राधिका लवेकर, रसिका काजारी आदी महिला पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

BJP Chitra Wagh
Loksabha Election : सातारा लोकसभेसाठी भाजपने 'या' नेत्याला तिकीट द्यावं; रामदास आठवलेंनी नावंच केलं जाहीर

जिल्हाध्यक्ष ,रेखा खेराडे यांनी पक्ष वाढीविषयी भूमिका मांडली. तर चित्रा वाघ म्हणाल्या, भाजप परिवार आहे. या परिवारामध्ये तुमचा सर्वांचा सन्मान केला जाईल. तुम्ही जेव्हा चांगले काम करीत असता, तेव्हा तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु आपल्या पाठीशी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), गृहमंत्री अमित शाह, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांसारखे नेते आपल्या पाठीशी असल्यामुळे आपल्याला कोणीही थांबवू शकत नाही.

BJP Chitra Wagh
Sulkud Water Scheme : ..अन्यथा इचलकरंजीला सुळकूडमधूनच पाणी घेण्यात येईल; आमदार आवाडेंचा स्पष्ट इशारा

त्यांनी जिल्हाध्यक्षा सुरेखा खेराडे, परिमल भोसले, अनिकेत कानडे यांचे पक्षाविषयीच्या योगदानाबद्दल कौतुक केले. यावेळी माजी नगरसेविका रसिका देवळेकर, नुपूर बाचीम, विजय चितळे, प्रवीण कांबळी, शहर मंडल अधिकारी श्रीराम शिंदे, माजी नगरसेवक आशिष खातू, अनिल सावर्डेकर आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com