सावंतवाडीतील मोती तलावाच्या काठावर मगर

Crocodile Seen In Moti Talav Sawantwadi Sindhudurg News
Crocodile Seen In Moti Talav Sawantwadi Sindhudurg News

सावंतवाडी - येथील मोती तलावात मगरीचा वावर असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. काल (ता.4) रात्री दीडच्या सुमारास येथील हॉस्पिटल समोरील भागात मोती तलावाच्या काठावर मगरीचे दर्शन झाले. घटनेची माहिती मिळताच शहरातील काही युवकांनी धाडसाने मगरीला जेरबंद करून वन विभागाच्या ताब्यात दिले.

गेली सहा वर्षे मगरीबाबत साशंकता

सहा वर्षापूर्वी मोती तलावात मगर आहे की नाही त्याबाबत कोणालाही माहीत नव्हते; मात्र पाच वर्षांपूर्वी साडेचार फूट लांब असलेली एक मगर तलावात असलेल्या कारंजावर ऊन खाण्यासाठी बसलेली दिसून आली. त्यानंतर मोती तलावात मगरीचे वास्तव्य असल्याचे समजण्यात आले. त्यानंतर दोन वर्षांनी चिटणीस नाक्‍याजवळील बापूसाहेब पुतळ्याजवळ एक भली मोठी मगर मृत अवस्थेत आढळून आली होती. या घटनेनंतर तळ्यात पुढील वर्षे मगर दिसली नव्हती; मात्र काल (ता.4) रात्री अचानक येथील हॉस्पिटल समोरील तलावाला लागून असलेल्या फुटपाथवर मगर अवतरली. या मगरीला पाहताच युवकांची तारांबळ उडाली.

सावंतवाडी शहरातील युवकांनी शिताफीने केले जेरबंद

मगर असल्याची कल्पना लागताच शहरातील युवक दिव्या सूर्याजी, संदीप निवळे, शुभम बिद्रे, अर्चित पोकळे, भिकाजी राऊळ, वसंत पडते यांनी घटनास्थळी धाव घेतली. या मगरीला शिताफीने पकडले आणि जेरबंद केले. मगर पकडल्याची कल्पना त्यांनी वन विभागाला देली. वनविभागाचे कर्मचारी तातडीने  घटनास्थळी  यांनी धाव घेत मगरीला आपल्या ताब्यात घेतले. युवकांनी रात्रीची वेळ असताना मगरीकडून कोणालाही हानी होऊ नये, या उद्देशाने मोठ्या शिताफीने धाडस दाखवत मगरीला ज्याप्रकारे जेरबंद केले यासाठी युवकांचे वनविभागाकडून कौतुक करण्यात आले. या मगरीला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले असल्याची माहिती वनविभागाचे उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com