सावधान ! ‘ईटीएफ कार’ सिंधुदुर्गात दाखल

ETF car arrives in Sindhudurg
ETF car arrives in Sindhudurg

ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यातील महामार्ग पोलिस दलाकडे अद्ययावत यंत्रसामग्री असलेली ईटीएफ कार दाखल झाली आहे. ही कार महामार्गावर उभी असताना किंवा महामार्गावर धावत असताना या कारच्या समोरून येणाऱ्या किंवा ओव्हरटेक करून जाणाऱ्या कोणत्याही वाहनचालकाने वाहतुकीचे नियम मोडले तर ईटीएफ कार अद्ययावत यंत्रावर दखल घेणार आहे.

याबाबत थेट उपप्रादेशिक परिवहन कायालयाला त्या वाहनचालकाची चूक आणि त्यावरील दंड कळविणार आहे.
त्यानंतर उप प्रादेशिक परिवहन कार्यालय त्या वाहन चालकावर कारवाई करणार आहे. तसेच वाहन मालकाकडून दंडही वसूल केला जाणार आहे. त्यामुळे आता वाहन चालकांवर या ईटीएफ कारची करडी नजर राहणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर महामार्ग पोलिस दलाकडे या अद्यावत एटीएफ कार दाखल झाल्या आहेत. लवकरच मोबाइल ॲपही लाँच करण्यात येत आहे.

वाहनचालकांनी सीटबेल्ट न लावणे दुचाकीवर हेल्मेट न घालणे तसेच वेगमर्यादा ओलांडणे या तीन चुकांची दखल ही ईटीएफ कार अद्ययावत मशिनरीवर घेणार आहे. अद्ययावत स्वयंचलित मशिनरीसह  स्पीड गन व इंटरनेट व्यवस्था ही या कारमध्ये उपलब्ध आहे. ही व्यवस्था सांभाळण्यासाठी या कारमध्ये पोलिस ऑपरेटरही तैनात असणार आहे. सध्या त्यांचे प्रशिक्षण सुरू झाले आहे.

जवळपास वीस लाख किमतीची ही कार असून या कारमध्ये जवळपास सहा लोकांची आसन व्यवस्था आहे. मोबाईल ॲप विकसित झाल्यानंतर या एटीएफ कारने वाहनचालकांच्या चुकीची दखल घेताच वाहन मालकाला ही तत्काळ संदेश जाणार आहे व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे ही तो संदेश जाणार आहे.

दरम्यान, आता मात्र वाहन चालकांचा निष्काळजीपणा आणि वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या वाहनचालकांवर ही ‘ईटीएफ कार’ लक्ष ठेवणार आहे. त्यामुळे आता तरी वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण कमी करण्यास यश मिळेल, अशी अपेक्षा काहींनी व्यक्त केली आहे.

...तर दंड नंतर वसूल 
वाहनचालकाची चूक झाल्यानंतर ते वाहन थांबले नाही, तर त्या चुकीचा दंड त्या वाहनमालकाकडून त्या उपप्रादेशिक कार्यालयाकडून वसूल केला जाईल. समजा ते वाहन चालकाने थांबविले तर त्याच ठिकाणी ई चलनाने दंड भरून घेण्याची सोय आहे. जर वाहनचालकाकडे तेवढे पैसे नसतील तर अनपेडची नोंद करून ते वाहन सोडले जाण्याची संधी आहे व हा दंड शेवटी वाहनमालकाच्या नावे उपप्रादेशिक कार्यालयाकडून वसूल केला जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com