esakal | या जिल्ह्यात झेंडूची फुले दुपटीने महागली; कोरोना व अतिवृष्टीचा परिणाम
sakal

बोलून बातमी शोधा

फुले खरेदी करताना ग्राहक.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लादण्यात आलेले लॉकडाऊन आणि अतिवृष्टीमुळे बाजारात फुलांचा साठा कमी आला आहे. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात गोंड्याची फुले गेल्यावर्षीपेक्षा दुपटीने महागली आहेत.

या जिल्ह्यात झेंडूची फुले दुपटीने महागली; कोरोना व अतिवृष्टीचा परिणाम

sakal_logo
By
प्रमोद जाधव

अलिबाग : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लादण्यात आलेले लॉकडाऊन आणि अतिवृष्टीमुळे बाजारात फुलांचा साठा कमी आला आहे. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात गोंड्याची फुले गेल्यावर्षीपेक्षा दुपटीने महागली आहेत. वाढत्या महागाईवर नाक मुरडत ग्राहकांनी काटकसर करत खरेदी केली. त्यामुळे फुलांच्या खरेदीवर परिणाम झाला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेने यावर्षी खरेदीत 40 टक्के घट झाल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले आहे. 

जिल्ह्यात गणेशोत्सवाची धूम शनिवारपासून (ता. 22) सुरू होत आहे. बाप्पाच्या स्वागतासह सजावटीसाठी लागणाऱ्या गोंड्याची फुले बाजारात दाखल झाली. तसेच, वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांनी जिल्ह्यातील बाजारपेठाही सजल्या आहेत. गोंड्यापासून शेवंती, गुलछडी अशा अनेक प्रकारची फुले खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड होऊ लागली आहे. 

अधिक वाचा : सुशांतचा मृतदेह पाहून रिया म्हणाली, 'सॉरी बाबू'

या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन घोषित केले होते. त्यामुळे ऐन हंगामात तयार झालेली फुले टाकण्याची वेळ आली होती. त्यातच गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे नवी मुंबईच्या बाजारात फुलांचा साठा कमी आला आहे. फुलांचा तुटवडा, वाहतुकीचा खर्च, लॉकडाऊन, अतिवृष्टी अशा अनेक कारणांमुळे गोंड्याची फुले दुपटीने महागली आहेत.

महत्त्वाची बातमी : सुशांत सिंह राजपूत प्रकरणात CBI कडून थेट मुंबई पोलिसांची चौकशी?

हेही वाचा : वरुणराजाच्या सरींत नवी मुंबईत बाप्पाचे आगमन; पावसामुळे गणेशभक्तांची गैरसोय 

गेल्यावर्षी गणेशोत्सवाच्या हंगामात 200 रुपये किलो गोंड्याची फुले होती; परंतु या वर्षी 400 रुपये किलो फुलांचा दर आहे. त्यामुळे गणेशभक्तांनी काटकसर करत ज्या ठिकाणी एक किलो फुले घ्यायची आहेत. त्या ठिकाणी अर्धाच किलो फुले खरेदी केली आहेत. त्यामुळे खरेदीतही सुमारे 40 टक्के घट झाल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. 

गोंड्याचे दर 
गेल्या वर्षी 
200 रुपये किलो 
या वर्षी 
400 रुपये किलो 

मोठी बातमी : मुंबईत सातमजली इमारतीला लागली आग; अनेक जण अडकल्याची भीती

लॉकडाऊन, अतिवृष्टीमुळे फुलांचे दर यंदा दुपटीने वाढले आहेत. बाप्पाच्या स्वागतासह पूजेसाठी लागणारी फुले जरी महाग असली, तरीही ग्राहकांनी खरेदी केली. परंतु या वर्षी खरेदीत घट असल्याचे दिसून आले आहे. 
- रवी आंबेकर, फुलेविक्रेते 

यंदा फुले भरपूर महाग आहेत. त्यामुळे काटछाट करत फुले खरेदी करण्याची वेळ आली आहे. 
- आशालता चव्हाण, ग्राहक 

(संपादन : उमा शिंदे)

loading image
go to top