Monsoon Alert : 'या' तालुक्यातील 19 गावांना दरडीचा धोका; प्रशासन अलर्ट मोडवर

दरड कोसळून जीवित व वित्तहानी होण्याचा शक्यता असल्याने धोकादायक गावांतील नागरिकांना सूचना देण्यात आल्या आहेत.
Landslide
Landslideesakal
Summary

आपत्कालिन परिस्थितीत धोकादायक गावातील नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात येते.

मंडणगड : पावसाळ्यातील आपत्तींचे निवारण करण्याकरिता विविध पातळ्यांवर नियोजन करून महसूल प्रशासनास यंत्रणा सज्ज आहे, अशी माहिती तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी दिली.

Landslide
Siddheshwar Factory : चिमणीच्या पाडकामानंतरही विमानाचं उड्डाण अवघड; 62 एकराचा वाद, 105 अडथळे

मंडणगड तालुक्यातील (Mandangad) १९ गावांना दरड कोसळून जीवित व वित्तहानी होण्याचा शक्यता असल्याने धोकादायक गावांतील नागरिकांना सूचना देण्यात आल्या आहेत. आपत्कालिन परिस्थितीत धोकादायक गावातील नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात येते.

त्यासाठी गावांमध्ये कम्युनिकशन ग्रुप तयार करण्यात आला आहे. यात मंडल अधिकारी, तलाठी, पोलिस पाटील, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, सरपंच, उपसरपंच यांच्यासह गावातील राजकीय पक्षांचे पदाधिकारी व महत्वाच्या व्यक्तींचा समावेश आहे.

Landslide
NCP Crisis : राष्ट्रवादीत आधे इधर, आधे उधर; 'या' आमदाराच्या अनुपस्थितीने चर्चांना उधाण

ग्रुपमध्ये सातत्याने संपर्क व माहितीचे आदानप्रदान सुरू केले आहे. पावसाळ्यात तालुक्यातील प्रमुख मार्ग दरड कोसळून बंद झाल्याने वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार घडू नयेत यासाठी सार्वजनिक बांधकाम व महामार्ग प्राधिकरणास अर्लट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

त्याकरिता त्या त्या भागात जेसीबी ट्रॅक्टर, मनुष्यबळ यांची उपलब्धता करण्यात आली याशिवाय दरडी कोसळण्याची शक्यता असलेल्या तालुक्याची सर्व ठिकाणी वाहनचालकांकरिता वाहने सुरक्षित चालवण्यासाठी सूचनाफलकही लावण्यात आले आहेत.

Landslide
Government Scheme : गाई पाळा अन् मिळवा तब्बल 'इतके' अनुदान; सरकारने सुरू केली 'ही' योजना

तहसील कार्यालयात आपत्कालिन कक्ष सज्ज ठेवण्यात आला असून, संकटकाळात तालुकावासीयांना तातडीने मदत उपलब्ध व्हावी यासाठी ८००७२२५२३६ हा क्रमांक २४ तास उपलब्ध ठेवण्यात आला आहे. आपत्तीशी संबंधित सर्व प्रशासकीय खात्यांना आपत्तीसाठी तत्पर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com