'बीएमसी' चोर कोकणात आला अन् परत गेला; निलेश राणेंचा पुन्हा प्रहार

'बीएमसी' चोर कोकणात आला अन् परत गेला; निलेश राणेंचा पुन्हा प्रहार

कणकवली - चार हाडांचा बीएमसी चोर कोकणात आला होता आणि परत गेला. बाकीचं लवकरच बोलू, अशा शब्दात माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता टिका केली आहे. या संदर्भातील त्यांचे ट्विट सध्या चर्चेत आहे.

दरम्यान ठाकरे यांच्या टिकेनंतर रत्नागिरी जिल्ह्यातील भाजपची काय प्रतिक्रिया आहे याबाबत उत्सुकता लागून राहीली आहे. सिंधुदुर्गातील टिकेचा रत्नागिरीत निश्चितच पडसाद उमटणार आहेत.

दरम्यान काल श्री. ठाकरे यांनी सेनेचे उमेदवार सतीश सावंत यांच्या प्रचारासाठी कणकवलीत सभा घेतली. भाजपच्या नितेश राणे यांच्या विरोधात सेनेने येथे उमेदवार दिला आहे. यामुळे सध्या कोकणात राणे - ठाकरे यांच्यातील वाद उफाळून आला आहे. मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर टिका करू नका असा सल्ला माजी खासदार नारायण राणेंना दिला होता. तो पाळत राणेंनी संयम पाळला. पण श्री. ठाकरे यांनी केलेले टिकेमुळे कोकणातील भाजप शिवेसेनेतील वाद उफाळून आला आहे. 

रत्नागिरीत शिवसेना सर्वच्या सर्व पाच जागा लढवत आहे तर सिंधुदुर्गात तीन जागा लढवत आहे. ठाकरे यांच्या टिकेमुळे रत्नागिरीत शिवसेने सोबत असणाऱ्या भाजपमध्ये आता फुट पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

दरम्यान, राणेंवर झालेल्या टिकेचा चिपळूण भाजपमधील कार्यकर्ते जाहीर निषेध करणार आहेत. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन यांनी कालच भाजपवर टिका करु नका असा इशारा दिला होता. पण सिंधुदुर्गात तो पाळला गेला नाही. याचा परिणाम रत्नागिरीत जाणवू लागला आहे.  संगमेश्वर भाजपच्या प्रतिक्रियेबाबतही आता उत्सुकता लागून राहीली आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com