गणपतीपुळेत ३४ हजारांवर पर्यटक; पर्यटकांची सागरी क्रीडांना पसंती

महामंडळाचे निवास झाले हाउसफुल्ल
ganpatipule bech
ganpatipule bech

रत्नागिरी : ख्रिसमसचा (christmas)आनंदोत्सव साजरा करण्यासाठी पर्यटकांची (tourist)पावले गणपतीपुळेसह(ganpatipule) जिल्ह्यातील किनारी पर्यटनस्थळांकडे वळलेली आहेत. सलग दोन दिवस गणपतीपुळे पर्यटनस्थळ गजबजलेले होते. सुटीच्या दोन दिवसांत ३४ हजार पर्यटकांनी हजेरी लावल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे व्यावसायिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.पर्यटकांचा सर्वाधिक ओढा रत्नागिरी (ratnagiri)आणि सिंधुदुर्ग(sindhudurga) जिल्ह्याकडे वाढलेला आहे. ओमिक्रॉनचा(omicron) प्रादुर्भाव लक्षात घेऊन शासनाने निर्बंध लागू केले होते. त्याचा पर्यटन व्यावसायावर परिणाम होईल, अशी शक्यता होती; मात्र कोरोनाचे नियम(corona rules) पालन करत पर्यटकाचा राबता कायम आहे.

स्वस्त दरातील विदेशी मद्य लवकरच बाजारात

गणपतीपुळेसारख्या प्रसिद्ध पर्यटनस्थळी पर्यटकांचा संमिश्र प्रतिसाद होता. येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या(MTDC) निवास रिसॉर्ट दोन दिवस हाउसफुल्ल होते, मात्र खासगी लॉजिंगमध्ये ८० टक्के पर्यटकांचा राबता होता. गणपतीपुळे देवस्थानमध्ये शनिवारी (ता. २५) १५ हजार ५०० तर रविवारी दिवसभरात १८ हजार पर्यटकांनी हजेरी लावली. ख्रिसमसला जोडून शासकीय सुट्या आल्यामुळे बराचसा पर्यटक वर्ग शनिवारी दुपारनंतर गणपतीपुळे दाखल झाला. दुपारपर्यंत नेहमीचीच गर्दी होती. काही पर्यटकांनी शनिवारचे निवास आरक्षण रद्द केले होते; परंतु हे प्रमाण अत्यंत कमी होते. शनिवारी दुपारी आयत्यावेळी येणारा वर्ग अधिक असल्यामुळे रद्द झालेली

पोकळी भरून निघाली.

गेल्या दोन दिवसांत रत्नागिरीत आलेल्या पर्यटकांमध्ये विविध जिल्ह्यातील गाड्या दिसत होत्या. गतवर्षीच्या तुलनेत यंदा पर्यटकांची संख्या दुप्पट आहे. खासगी निवास, हॉटेल्स, किनाऱ्यावर सागरी क्रीडांकडे पर्यटकांचा ओढा होता. पर्यटक जिल्ह्यातील अन्य पर्यटन स्थळांचीही सैर करूलागले आहेत.

विशेष कार्यक्रमांचे आयोजन

नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक हॉटेल व्यावसायिकांनी विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन रत्नागिरी जिल्ह्यात कमी होत असले तरीही ग्रुपने फिरायला येणाऱ्यांची संख्या रत्नागिरीत अधिक असते.

ganpatipule bech
बहिणीला भेटून घरी जाणाऱ्या भावावर काळाची झडप, नाल्यात कोसळून मृत्यू

ख्रिसमसचे दोन दिवस पर्यटकांचा निवास व्यवस्थेसाठी चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे व्यावसायिकांना दिलासा आहे. नववर्षाचे दोन दिवस निवासाला पर्यटकांकडून बुकींग आहे. मधले तीन दिवस पर्यटक संख्या किती राहते यावर व्यावसायिक गणित अवलंबून राहील.

- प्रमोद केळकर, हॉटेल व्यावसायीक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com