सावंतवाडी जमीन गैरव्यवहाराची चौकशी करा ; मनसे माजी आमदाराची मागणी

जमीन गैरव्यवहारबाबत लोकायुक्तांकडे तक्रार करणार-परशुराम उपरकर
Parashuram Upkar
Parashuram UpkarEsakal

कणकवली (सिंधुदुर्ग): सावंतवाडी (Sawantwadi) तालुक्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणाची कसून चौकशी व्हावी. यासाठी संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी मनसेचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर (Parashuram Upkar) यांनी आज पत्रकार परिषदेत केली. याबाबत लोकायुक्तांकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. मनसेच्या (MNS) कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते यावेळी त्यांनी मागणी केली.

Parashuram Upkar
पाकिस्तान युध्दकैदी मेजर सिंग यांच्या सुटकेवर SC ने मागितले उत्तर

यावेळी बोलताना उपरकर म्हणाले, "सावंतवाडी तालुक्यातील केसरी-फणसवडे गावातील व्यवहाराबाबत गुन्हा दाखल केलेला आहे; मात्र, संबंधित अधिकारी यापूर्वी बेकायदा वाळू वाहतुकदारांकडून आर्थिक फायदा करून घेत होते. याचीही चौकशी व्हावी. त्या कार्यालयांमध्ये अवैध खनिजाबाबत दंड वसुली न करता व्यावसायिकांकडून थेटपणे आर्थिक फायदा करून घेतला जात होता. तसे आपल्याकडे पुरावे आहेत, असेही उपरकर यांनी यावेळी नमूद केले.

Parashuram Upkar
मनसे-भाजप युती होणार? गिरीश महाजन म्हणाले,वरिष्ठांचा निर्णय...

संबंधित अधिकाऱ्याची तीन वर्षे झाल्यानंतर बदली होणार होती; मात्र जमीन दलालांनी ही बदली रोखण्यासाठी आपल्या परीने प्रयत्न केले. यासाठी त्या परिसरातील एका आमदाराचाही सहभाग असल्याचे श्री. उपरकर यांनी यावेळी नमूद केले. न्यायप्रविष्ठ असलेल्या प्रकरणांची सुनावणी करून काही प्रकरणांमध्ये कुळांची नावे जमिनीवर नोंदविल्याचे पुरावे आहेत. त्यामुळे गरिबांना न्याय मिळत नाही. कूळ कायद्याच्या तक्रारीबाबत दोन ते तीन वेळा सुनावणी घेऊन निकाल दिले जात आहेत. याबाबतही चौकशी होणे गरजेचे आहे. जमीन व्यवहारात वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही '४३ ग'ची परवानगी देऊन जमिनी खरेदी करण्यास सहकार्य केले आहे. याबाबतही चौकशी होणे गरजेचे आहे.

Parashuram Upkar
नवाब मलिकांच्यावर ईडी कारवाई होताच मुनगंटीवार,भातखळकर म्हणाले...

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संगनमताने सुरू असलेल्या प्रकाराबद्दल मनसेने यापूर्वी जिल्हाधिकार्यालयावर मोर्चा काढला होता. या मोर्चामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याची चौकशी व्हावी, अशी त्यावेळी मागणी केली होती. सावंतवाडी परिसरातील ज्या जमीन मालकांनी न्यायालयामध्ये दावे दाखल केले होते, अशा न्यायप्रविष्ठ प्रकरणांचे निकाल कसे काय लागले? यासाठी खातेदाराकडून आर्थिक व्यवहारही केला गेला. अशाच एका प्रकरणामध्ये आर्थिक व्यवहार झाला आहे. त्याबाबतची तक्रारदार आणि संबंधित अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप मनसेकडे असून, ती लवकरच व्हायरल केली जाईल, असेही श्री. उपरकर यांनी यावेळी सांगितले. केसरी-फणसवडे गावातील जमीन व्यवहारात एका तत्कालीन सस्ताधारी माजी राज्यमंत्र्याचा सहभाग आहे. त्या गावांमध्ये वनसंज्ञा असूनही वृक्षतोडीला परवानगी दिली गेली."

मनसे कार्यालयात तक्रारी घेणार

सावंतवाडी येथील मनसेच्या कार्यालयात १६ एप्रिलला जमीन तक्रारदारांच्या बैठकीचे आयोजन केले आहे. सकाळी ११ वाजता ही बैठक होणार असून, ज्या तक्रारदारांना आपले मत सांगायचे आहे किंवा लेखी तक्रारी करायचे असतील, त्यांनी मनसे कार्यालयात संपर्क साधावा. या बैठकीला उपस्थित राहून आपल्या तक्रारी नोंदवाव्यात, असे आवाहनही श्री. उपरकर यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com