सावंतवाडीमध्ये जखमी पक्षाला तरुणांनी दिले जीवदान

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 जुलै 2017

सावंतवाडीः मुंबई-गोवा महामार्गावर जखमी अवस्थेत पडलेल्या हळदया पक्षाला सावंतवाडीतील तरूणांनी जीवदान दिले. हा प्रकार आज (गुरुवार) सायंकाळी पाच वाजता घडला. पक्षी जखमी अवस्थेत रस्ताच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात पडला होता, त्याच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर तो पुन्हा नैसर्गिक अधिवासात गेला.

सावंतवाडीतील ओंकार कलामंचाचे सदस्य अमोल टेंबकर, अनिकेत आसोलकर, मयूर नाईक यांनी यासाठी सहकार्य केले. याबाबतची माहिती वनविभागाकडून देण्यात आली. संबधित पक्षी हळदया नावाने ओळखला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

सावंतवाडी वनविभागाचे सहाय्यक उपवनसंरक्षक सुभाष पुराणीक म्हणाले, 'हळदया नावाज्या पक्षाच्या डोक्याकडील काही भाग काळा तर अन्य भाग पिवळा असतो. या हंगामात ते पिल्ले घालण्यासाठी घरटी बांधतात. यासाठी त्यांच्यात चढाओढ असते, यातून त्यांच्यात भांडण झाले असावे आणी पळून जाताना तो पक्षी गाडीला आदळला असावा, असा संशय आहे. हा पक्षी कीडे, फळे खातो. इग्रजी भाषेत त्याला ब्लॅक हुडेड ओरीओल असे म्हणतात.'

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:

Web Title: sawantwadi news black headed oriole bird injured