Sangameshwar-Kolhapur Route Bus Accident
Sangameshwar-Kolhapur Route Bus Accidentesakal

Bus Accident : संगमेश्वर-कोल्हापूर मार्गावर बस दरीत कोसळून 13 प्रवासी जखमी; काय आहे अपघाताचं कारण?

देवरूखकडून संगमेश्वरकडे येणारी बस लोवले येथे मोरीजवळ दरीत कोसळली.
Summary

सध्या अपघातग्रस्त बघ दरीतून बाहेर काढण्यात आली असून काही जखमी प्रवाशांवर उपचार सुरु असल्याची माहिती आहे.

संगमेश्वर : संगमेश्वर-कोल्हापूर राज्य मार्गावर (Sangameshwar-Kolhapur Route) देवरूखकडून संगमेश्वरकडे येणारी बस लोवले येथे मोरीजवळ दरीत कोसळली. या अपघातामध्ये (Bus Accident) बसमधील तेरा प्रवासी (Passengers) जखमी झाले आहेत.

देवरुख आगाराच्या (Devrukh Agar) सदर बसचा अपघात काल संध्याकाळी ६:३० वाजण्याच्या दरम्यान घडला. सध्या अपघातग्रस्त बघ दरीतून बाहेर काढण्यात आली असून काही जखमी प्रवाशांवर उपचार सुरु असल्याची माहिती आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला हे अद्याप समजू शकलेले नाही.

Sangameshwar-Kolhapur Route Bus Accident
आमदार साळवींच्या पत्नीची तब्बल 5 तास चौकशी; आरोपीच्या रजिस्टरवर सही करावी लागल्याने अनुजा साळवींना अश्रू अनावर

बसमधील सुमित पांडुरंग संसारे, रा. दापोली, साक्षी शंकर लिंगायत वय ४१ रा. तुरळ, सतीश शिवराम करदोडे कोंडअसुर्डे, शेखर सदाशिव चव्हाण संगमेश्वर, ज्योतिबा श्रीपती पवार वय ३५ रा. देवरुख, निवृत्ती रामकृष्ण माने सावर्डे, दिलीप बारकू लेवारे, रा. नाशिक, बबन कृष्णा पवार, फणसवळे, रुद्र संतोष चव्हाण १२ कोळंबे, अतिक रहमान पटेल, पांडुरंग संसारे दापोली, सिद्धी संदीप घडशी माभळे, शिवानी खातू संगमेश्वर हे जखमी झाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com