
-rat१९p३५.jpg-
२५N५२२२६
रत्नागिरी : फिनोलेक्स अॅकॅडमीमध्ये नेत्रतपासणी शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद.
-------
‘फिनोलेक्स’मध्ये नेत्रतपासणी शिबिर
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २०: फिनोलेक्स अॅकॅडमीमध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि इन्फिगो आयकेअर हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने नेत्रतपासणी शिबिर घेण्यात आले.
याचे उद्घाटन फिनोलेक्स अॅकॅडमीचे प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद यांनी केले. इन्फिगो आयकेअरच्या डॉ. शीतल साळुंके यांनी या वेळी मार्गदर्शन केले. चुकीच्या जीवनशैलीमुळे उद्धवणाऱ्या निरनिराळ्या नेत्ररोगाविषयी आणि ते होऊ नयेत म्हणून घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले.
या शिबिरामध्ये एकूण १७५ विद्यार्थी व विद्यार्थिनी, प्राध्यापक, कर्मचाऱ्यांची नेत्रतपासणी करण्यात आली. प्राचार्य डॉ. प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली एनएसएसचे कार्यक्रमाधिकारी प्रा. उमेश सामंत, प्रा. सचिन गुरव, प्रा. प्रियांका दाते, प्रा. सौरभ शहाणे यांनी कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.