लाईव्ह न्यूज

शृंगारतळीत काँक्रिट गटारे मोकाट गुरांसाठी जीवघेणी

शृंगारतळीत काँक्रिट गटारे मोकाट गुरांसाठी जीवघेणी
Published on: 

- rat२१p५३.jpg -
२५N६५४०५
गुहागर- गटारात पडलेले उनाड गुरे.
----
शृंगारतळीतील गटारी बनल्या धोकादायक
‘मनसे’ आक्रमक ; निकृष्ट काँक्रिट बांधकामाचा परिणाम
सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. २२ : तालुक्यातील शृंगारतळी बाजारपेठेत राष्ट्रीय महामार्ग रूंदीकरणात रस्त्याच्या दोन्ही बाजूने काँक्रिट गटारी बांधण्यात आल्या आहेत; मात्र, त्यांची कामे अर्धवट व निकृष्ट झाल्याने या गटारींमध्ये मोकाट जनावरे पडून ती जखमी होत आहेत. या विरोधात गुहागर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रसाद कुष्टे यांनी नाराजी व्यक्त केली असून, निकृष्ट बांधकामाविरूद्ध आंदोलनाचा इशारा दिला आहे.
गुहागर-विजापूर रस्ता रूंदीकरणात शृंगारतळी जानवळेफाटा ते मच्छीमार्केटपर्यंत रस्त्याच्या दोनही बाजूने काँक्रिटची गटारी बांधण्यात आल्या आहेत. शहरातील गटारींची काही कामे अर्धवट आहेत, तर काही कामे पूर्ण झाली आहेत. हे बांधकामे निकृष्ट असल्याचे चित्र आहे. काँक्रिट पडून लोखंडी सळ्या बाहेर येणे, मध्येच काँक्रिटला तडे जाणे व बांधकाम ढासळणे असे प्रकार सुरू आहेत. मध्यंतरी गटारींमध्ये माणसेही पडण्याचे प्रकारही घडले होते. हॉटेल कोकणरत्नसमोर काँक्रिट गटारात एक वासरू पडले आणि जखमी झाले. पाटपन्हाळे ग्रामपंचायतीचे कर्मचारी बाबू तेलगडे व काही नागरिकांनी या वासराला बाहेर काढले. वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे येथील काँक्रिटची गटारी जीवघेणी ठरली आहेत. अर्धवट गटारींची कामे पूर्ण करून जी तुटलेली आहेत, त्यांचीही दुरुस्ती व्हावी अन्यथा आम्हाला आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल, असा इशारा प्रसाद कुष्टे यांनी दिला आहे.
---
निकृष्ट बांधकामाची चौकशी करा
तालुक्यातील शृंगारतळी बाजारपेठेतील राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणात रस्त्याच्या दोन्ही बाजूने कॉंक्रिट गटारी बांधण्यात आल्या आहेत. मात्र त्यांची कामे अनेक ठिकाणी अर्धवट आणि निकृष्ट झाली आहेत. त्यामुळे या गटारींमध्ये नागरिकांसह जनावरे पडण्याचे प्रकार घडू लागले आहेत. त्यामुळे जीवितहानीही होण्याचे धोके वाढले आहेत. या निकृष्ट गटारींच्या कामाची चौकशी व्हावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com