लाईव्ह न्यूज

विद्यार्थ्यांनो, मोबाईलच्या विळख्यातून बाहेर पडा

विद्यार्थ्यांनो, मोबाईलच्या विळख्यातून बाहेर पडा
Published on: 

71017

विद्यार्थ्यांनो, मोबाईलच्या विळख्यातून बाहेर पडा

जिल्ह्याधिकाऱ्यांचे आवाहन; कुडाळ-कुंभारवाडा शाळेत स्वागतोत्सव उपक्रम

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १६ ः पावसाची रिमझिम...मुलांच्या शाळेच्या पहिल्या दिवसाच्या आनंदाला उधाण आणणारा दिवस...विविध वेशभूषा साकारलेले पहिलीचे विद्यार्थी...लेझीम पथक आणि ढोल ताशाच्या गजरात कुडाळ-कुंभारवाडा शाळेत नव विद्यार्थ्यांचे दिमाखात स्वागत करण्यात आले. स्वागताचा हा सोहळा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. मुलांनी शिक्षणाचा लाभ घेऊन चांगले नागरिक बनावे. मोबाईलच्या विळख्यातून बाहेर पडावे, असे आवाहन जिल्हाधिकारी पाटील यांनी केले.
मे महिन्याच्या शालेय सुटीनंतर आज जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू झाल्या. गेले दीड ते दोन महिने सुटीमुळे शुकशुकाट असणाऱ्या शाळा आज विद्यार्थी, शिक्षक, पालकांच्या गर्दीने गजबजल्या. शहरातील पीएमश्री जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कुंभारवाडा शाळेच्या नव विद्यार्थ्यांचे स्वागत, गणवेश व शालेय साहित्य वितरण अशा सोहळ्याचे आयोजन आज जिल्हाधिकारी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी कुडाळ नगरपंचायत नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर, प्राथमिक उप शिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे, माजी नगराध्यक्ष अक्षता खटावकर, नगरसेवक उदय मांजरेकर, गणेश भोगटे, केळबाई देवस्थानचे कृष्णा घाडी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनिता आढाव, केंद्रप्रमुख महेश परुळेकर, मुख्याध्यापिका सौ. स्वप्नाली सावंत, प्राची आंगणे, सायली कदम, चैत्राली पाटील, गौरी गोसावी, स्वराली लाड, ऋतुजा गावडे, गुरुप्रसाद सावंत, दिपाली मोहिते आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पाटील म्हणाले, ‘‘कुंभारवाडा शाळेने अतिशय स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. या शाळेने शैक्षणिक क्षेत्रात नावलौकिक मिळविला आहे. श्री देवी केळबाईच्या छायेखाली ही कुंभारवाडा शाळा असल्यामुळे या शाळेचा उत्कर्ष निश्चित होणार आहे. आज नवनवीन विद्यार्थी शाळेत दाखल झाले आहेत. मुलांनी शिक्षणाचा लाभ घेऊन भविष्यात चांगले नागरीक बनावे. शाळेत शिकताना शिक्षकापेक्षा पालकांसोबत जास्त वेळ असतो. त्यामुळे पालकांनी मुलांनी काय शिकले? याबाबत त्याची उजळणी घेणे महत्त्वाची आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात मोबाईल कमी केले पाहिजेत. ही पालकांनी पहिली महत्वाची जबाबदारी पार पाडली पाहिजे. या शाळेत योगसह अन्य स्तुत्य उपक्रम राबवले जातात. त्याचा लाभ विद्यार्थी घेतो की नाही याबाबत पालकांनी सतर्क राहिले पाहिले. भविष्यात आपल्याला काय बनायचे आहे, ते स्वप्न आताच उराशी बाळगून विद्यार्थांनी वाटचाल केली पाहिजे.’’
नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांनी, विद्यार्थ्यांना अभ्यास करताना त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्याचे काम कुडाळ कुंभारवाडा शाळेचे सर्व शिक्षक करत आहेत. विशेष म्हणजे या ठिकाणी योग वर्ग सुरू आहे. विद्यार्थी संख्या मोठ्या प्रमाणात असताना या शाळेच्या इमारतीचा जो प्रश्न आहे तो आमदार नीलेश राणे यांच्या माध्यमातून सोडण्यासाठी निश्चितच प्रयत्न करीन, असे सांगितले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासह त्यांना शैक्षणिक साहित्य तसेच गणवेश वाटप केले. प्रशालेत ‘एक पेड माँ के नाम’ अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम झाला. शिक्षिका ऋतुजा गावडे यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापिका स्वप्नाली सावंत यांनी आभार मानले.
-------------
नव विद्यार्थ्यांच्या पावलांचे ठसे
जिल्हाधिकारी पाटील यांच्या उपस्थितीत श्री देवी केळबाई मंदिराभोवती विविध वेशभूषा साकारलेल्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत रॅली काढण्यात आली. लेझीम, ढोल पथकाच्या गजरात पहिलीच्या वर्गात ७५ मुले दाखल झाली. त्यांची पावले म्हणजे लक्ष्मीची पावले असून त्यांच्या पावलांचे ठसे घेऊन शाळेने एक वेगळा उपक्रम या ठिकाणी राबवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com