ओरोस : दोडामार्ग तालुक्यातील साटेली-भेडशी या ठिकाणी घडलेले प्रकार अजूनही काही ठिकाणी सुरू आहेत. असे प्रकार माझ्या जिल्ह्यात मी खपवून घेणार नाही. जिल्ह्यात बुलडोझर हे रस्त्याच्या कामाव्यतिरिक्त अजूनही काही ठिकाणी चालतात, हे अशा लोकांना दिसून येईल, असा इशारा जिल्ह्याचे पालकमंत्री नीतेश राणे (Nitesh Rane) यांनी दिला.