बांगलादेशच्या माजी कर्णधारालाही झाली कोरोनाची बाधा; वाचा सविस्तर... 

mortaza
mortaza

ढाका : दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव थांबण्याची कोणतीच लक्षणे दिसत नाहीत. सर्वसामान्यांसोबतच विविध क्षेत्रातील नामावंत लोकांनाही कोरोनाची बाधा झाल्याचे आपल्या निदर्शनास येत आहे. दरम्यान, बांगलादेशचा माजी कर्णधार मशरफी मोर्तझाला कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. गेल्या आठवड्यात त्याने चाचणी केली होती. त्याला या विषाणूची बाधा कशी याचे हे मात्र स्पष्ट झालेले नाही. 

बांगलादेशच्या लोकसभेचाही सदस्य असलेल्या मोर्तझाने मार्च महिन्यातच एकदिवसीय क्रिकेट कर्णधारपदाचा राजीमाना दिला आहे. बांगालदेशची जुलै महिन्यात श्रीलंकेविरुदधची तीन कसोटी सामन्यांची मालिका अपेक्षित आहे. त्यानंतर ऑगस्टमध्ये न्यूझीलंडचा संघ बांगालदेश दौऱ्यावर येणे नियोजित आहे.

मोर्तझा हा बांगलादेशचा यशस्वी कर्णधार म्हणून समजला जातो. त्याच्या नेतृत्वाखाली बांगलादेशने भारतालाही अनेक सामन्यात झुंझवलेले आहे. पण गेल्या काही सामन्यातून त्याची कामगिरी अपेक्षेप्रमाणे होत नसल्याने त्याच्यावर राजिनाम्यासाठी दडपण टाकण्यात येत होते. फेब्रुवारी महिन्यात बांगलादेशमध्ये झालेली झिम्बाब्वेविरुद्धची मालिका ही त्याची कर्णधार म्हणून अखेरची मालिका ठरली. मोर्तझा आत्तापर्यंत 220 एकदिवसीय सामन्यात खेळला असून त्याने 270 विकेट मिळवलेल्या आहोत. तर 36 कसोटी आणि 54 ट्वेन्टी-20 सामन्यात अनुक्रमे 78 आणि 42 विकेट घेतल्या आहेत.

तमिमचा भाऊही कोरोनाग्रस्त
मोर्तझा कोरोनाबाधित असल्याचे निदान होण्याअगोदर बांगलादेशचा सलामीवीर तमिम इक्बाल याचा भाऊ नफिझ यालाही कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. नफीसही आंतररराष्ट्रीय क्रिकेटपटू असून 2003 मध्ये तो 11 कसोटी आणि 16 एकदिवसीय सामने खेळलेला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com