हुश्श! खेळ प्रेमींसाठी आनंदाची बातमी; प्रेक्षकांशिवाय या देशात रंगली स्पर्धा

borussia dortmund,schalke bundesliga,german football league
borussia dortmund,schalke bundesliga,german football league

बर्लिन : कोरोना विषाणूमुळे ओस पडलेल्या मैदानात आशेची किरण दिसली आहे. युरोपच्या मैदानातून तमाम फुटबॉल चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. शनिवारी जर्मन लीगच्या स्वरुपात खेळाला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. जगभरात कोरोना विषाणूने घातलेल्या थैमानानंतर अनेक स्पर्धा स्थगित करण्याची वेळ आयोजकांवर आली होती. जगातील मानाची स्पर्धा समजल्या जाणाऱ्या ऑलिम्पिकसह अनेक स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या होत्या. यात युरोपातील फुटबॉल लीगची मैदानेही ओस पडली होती. जर्मन फुटबॉल लीग स्पर्धेच्या रुपातून कोरोनाच्या संकटजन्य परिस्थितीनंतर स्पर्धेला सुरुवात झाली आहे. कोरोनाजन्य परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जगभरातील विविध देशांनी लॉकडाउनचा निर्णय घेतला होता.  

दोन महिन्याच्या सक्तीच्या विश्रांतीनंतर संकटजन्य परिस्थितीतून सावरत खेळाच्या मैदानात 'अच्छे दिन' आल्याचे संकेत देणारी जर्मन लीग स्पर्धाही पहिली स्पर्धा ठरली आहे. आयोजकांनी स्पर्धेच्या परवानगीसंदर्भात जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल यांच्यासह 16 नेत्यांना निवेदन पाठवले होते. प्रेक्षकांशिवाय आणि मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याच्या अटीवर जर्मन फुटबॉल असोसिएशनला परवानगी देण्यात आली होती.  

जगाचा नव्हे देशाचा विचार करा! राहुल गांधींचा मोदींना प्रेमळ सल्ला

अन्य युरोपीय राष्ट्रांच्या तुलनेत जर्मनीमध्ये कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा कमी आहे. पण खबरदारी म्हणून प्रेक्षकांशिवाय सामने खेळवण्याची अट सरकार आणि प्रशासनाने आयोजकांना घातली आहे. 'बोरूसिया डार्टमंड' विरुद्ध स्थानिक संघ असलेल्या 'शाल्के 04' यांच्यातील सामन्याने जर्मन लीगला सुरुवात झाली. जर सामना प्रेक्षकांशिवाय खेळवला गेला नसता तर स्टेडियमवर जवळपास 82000 प्रेक्षक जमा झाले असते.

हजारोंची गर्दी टाळण्यासाठी प्रेक्षकांशिवाय सामना खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रेक्षकांशिवाय खेळवण्यात येणाऱ्या या स्पर्धेतील सामन्यात खेळाडूंना मास्क वापरण्याचीही सक्ती करण्यात आली आहे. गोल झाल्यानंतर गळाभेट किंवा हातात हात न घेता कोपराला-कोपर लावून सिलेब्रेशन करण्याची सूचनाही खेळाडूंना करण्यात आली आहे.  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com