

Suryakumar Yadav and Andre Russell on Vaibhav Sooryavanshi | SRH vs RR | IPL 2026
Sakal
बुधवारी (२७ मे) राजस्थान रॉयल्सने सनरायझर्स हैदराबादला आयपीएल २०२६ स्पर्धेतील (IPL 2026) मुल्लनपूरला झालेल्या एलिमिनेटर सामन्यात (Eliminator) ४७ धावांनी पराभूत केले. त्यामुळे हैदराबादचे (SRH) या स्पर्धेतील आव्हानही संपले.
राजस्थानसाठी (RR) या सामन्यात १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Sooryavanshi) अफलातून फटकेबाजी करताना ९७ धावांची खेळी केली. त्यामुळे राजस्थानसाठी हा विजय मिळवणे आणखी सोपे झाले. त्याने केलेल्या खेळीनंतर सध्या वैभवची दखल मोठमोठ्या दिग्गजांनी घेतली असून क्रिकेटवर्तुळातून त्याच्याबाबत प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यातही वेस्ट इंडिजचा दिग्गज अष्टपैलू आंद्रे रसेलने (Andre Russell) केलेल्या पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.