

CSK Captain Ruturaj Gaikwad | IPL 2026
Sakal
चेन्नई सुपर किंग्सने इंडियन प्रीमियर लीग २०२६ (IPL 2026) स्पर्धेतील पहिला विजय शनिवारी (११ एप्रिल) मिळवला. चेन्नईने (Chennai Super Kings) घरच्या मैदानावर चेपॉक स्टेडियमवर शनिवारी दिल्ली कॅपिटल्सला २३ धावांनी विजय मिळवला.
घरच्या मैदानात सलग ६ पराभवानंतर चेन्नईने पुन्हा आपला गड जिंकला आहे. त्यामुळे चेन्नईने पहिले २ पाँइंट्स मिळवले आहेत. मात्र या सामन्यानंतर बीसीसीआयकडून (BCCI) चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाडवर (Ruturaj Gaikwad) कारवाई झाली आहे. त्याच्यावर दंडात्मक कारवाई (Fined) झाली आहे.