IPL मध्ये 'धोनी युगाचा' आज शेवट होणार? चर्चेला उधाण; घरातील अखेरच्या सामन्यापूर्वी ऋतुराजला Dhoni ने काय दिला सल्ला?

MS Dhoni Advice for Ruturaj Gaikwad: चेन्नई सुपर किंग्स आयपीएल २०२६ स्पर्धेत चेपॉक स्टेडियमवर आज अखेरचा सामना खेळणार आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध होणारा हा सामना धोनीचा अखेरचा सामना असल्याची चर्चा आहे. या सामन्यापूर्वी धोनीने ऋतुराजला खास सल्लाही दिला आहे.
MS Dhoni - Ruturaj Gaikwad

MS Dhoni - Ruturaj Gaikwad

Sakal

Updated on

IPL 2026 CSK vs SRH Marathi News: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत ६३ वा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात सोमवारी (१८ मे) खेळवला जाणार आहे. हा सामना चेन्नईच्या घरच्या मैदानात म्हणजेच एमए चिदंबरम स्टेडियम (चेपॉक) येथे खेळवला जाणार आहे.

हा चेन्नईचा यंदाच्या हंगामातील घरच्या मैदानातील अखेरचा सामना आहे. तसेच चेन्नईसाठी (Chennai Super Kings) हा प्लेऑफमधील आव्हान कामय ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा सामना आहे. दरम्यान, हा सामना एमएस धोनीच्या (MS Dhoni) चाहत्यांसाठी भावनिक ठरण्याचीही चर्चा आहे.

MS Dhoni - Ruturaj Gaikwad
DC vs RR: वैभव सूर्यवंशी ठरतोय IPL चा नवा 'सिक्सर किंग'! १९ वर्षांच्या इतिहासात कोणत्याच भारतीयाला न जमलेला केलाय कारनामा
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com