

U19 India Team
Sakal
U19 India's big win over U19 Zimbabwe: १९ वर्षांखालील वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत भारतीय संघाने सेमीफायनलच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. मंगळवारी (२७ जानेवारी) सुपर सिक्स फेरीत भारताने झिम्बाब्वेला तब्बल २०४ धावांनी पराभूत केले.
आता भारताचा सुपर सिक्समधील एकमेव सामना बाकी असून हा सामना पाकिस्तानविरुद्ध १ फेब्रुवारीला होईल. जर हा सामनाही भारतीय संघ (Team India) जिंकला, तर भारतीय संघ सेमीफायनलमधील स्थान निश्चित करेल. या स्पर्धेत अद्याप तरी भारतीय संघ अपराजित राहिला आहे.