

KKR vs RR | IPL 2026
Sakal
IPL 2026, KKR vs RR Marathi News: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत रविवारी (१९ एप्रिल) दोन सामने होणार आहेत, यातील पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात होणार आहे. हे दोन्ही संघ या सामन्यातून विजयी मार्गावर येण्यासाठी उत्सुक असतील. या दोन्ही संघातील हा सामना हंगामातील २८ वा सामना असून कोलकाताच्या घरच्या मैदानात ईडन गार्डन्सवर होणार आहे.